Edition

इंधन तुटवड्यामुळं नाशिकहून गोवा, हैदराबादच्या विमानसेवेला ब्रेक लागण्याची शक्यता!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

नाशिक – नाशिककरांची विमान सेवेला चांगली पसंती मिळत असतानाच आता जूनपासून काही दिवस हैदराबाद व गोवा विमान सेवा स्थगित करण्यात येणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. आखाती देशात सुरू आलेले युद्ध आणि महागाईचा फटका विमान सेवेलाही बसला आहे.

विमानसेवेवर परिणाम होणार – आखाती देशातील युद्धामुळं इंधनाचे दर प्रचंड वाढल्यानं देशातील दोन विमान कंपन्यांनी एटीएफ अर्थात विमान इंधनाचे दर वाढल्याने विमानसेवेमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नाशिकहून नियमित सुरू असलेल्या गोवा तसेच हैदराबादकरिताच्या दोनपैकी एक सेवेला ब्रेक लागू शकतो. यापूर्वीच दिल्लीची दोन पैकी एक सेवा स्थगित करण्यात आली आहे. देशातील एअर इंडिया आणि इंडिगो या दोन मोठ्या एअरलाईन्स जूनपासून देशांतर्गत उड्डाणांमध्ये कपात करणार आहेत. त्यामुळं त्यांच्याकडून मिळणाऱ्या सेवा प्रभावित होणार आहेत.

नाशिकमधील विमानसेवेवर परिणाम – आखाती देशातील युद्धामुळे विमानांचे इंधन प्रचंड महागल्याने एअरलाईन्सचा खर्च वाढला आहे. बाजारात 90 टक्केपेक्षा जास्त भागेदारी असलेल्या या दोन कंपन्यांपैकी एक कंपनी नाशिक विमानतळावरून हैदराबाद, अहमदाबाद, इंदोर, दिल्ली, बंगळुरु, गोवा याकरिता नियमित विमानसेवा देते. दिल्लीकरिता दिवसातून दोन वेळा तर हैदराबादकरिता दोन विमानसेवा आहेत. यापैकी दिल्लीची एक सेवा स्थगित करण्यात आली आहे. जुलैपासून ती नियमित होण्याची शक्यता असतानाच विमान इंधनाच्या दरवाढीमुळे इतर मार्गावरील विमान सेवेमध्ये देखील कपात करण्याची चिन्ह आहेत.

नाशिकमधून ज्या सेवांमध्ये कपात होऊ शकते, त्यात गोव्याची विमान सेवा बंद होण्याची दाट शक्यता आहे. पावसाळ्यामुळे जूनपासून पर्यटनाचा येथील हंगाम थंडावतो. यामुळे या मार्गावरील सेवा स्थगित करणे कंपनीला योग्य ठरू शकते, असं मतं जाणकारांनी व्यक्त केलं आहे. मात्र, नाशिककरांची नेहमीच गोव्याच्या विमान सेवेला पसंती दिसून आली असून, यामुळे पर्यटकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.

जगभरात अशीच परिस्थितीत – आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात इंधन कोंडी निर्माण झाली आहे. एव्हीएशन टर्बाइन फ्युअल या विमान इंधनाच्या दरात 40 ते 50 टक्क्यांनी वाढ झाली. त्याचा विमान कंपन्यांना मोठा फटका सहन करावा लागत असून, सेवेमध्ये कपात करत आहेत. जगभरात हीच स्थिती आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

Share करें

✓ Link copy हो गया!

Leave a Comment

और पढ़ें