Edition

कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदासाठी डी के शिवकुमार यांचा मार्ग मोकळा, तीन जूनला होणार शपथविधी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

बंगळुरु – कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदासाठी डी के शिवकुमार यांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. डी के शिवकुमार यांची विधिमंडळनेतेपदी निवड करण्यात आली आहे. सिद्धरामय्या यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील कर्नाटक सरकारमधील नेतृत्वबदलाबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला. राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी (28 मे) आपल्या पदाचा राजीनामा दिला.

 

राजीनामा दिल्यानंतर काय म्हणाजे सिद्धरामय्या? – कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर सिद्धरामय्या म्हणाले “हायकमांडनं मला आधी राजीनामा देण्यास सांगितल्यानंतर, मी आज माझा राजीनामा सादर केला आहे. मला खात्री आहे की, राज्यपाल जेव्हा येतील तेव्हा ते तो स्वीकारतील, कारण ते संविधानानुसारच असायला हवे… आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे. त्यामुळं, मुख्यमंत्र्यांना (सरकार स्थापन करण्याची) परवानगी देणं हे घटनात्मक आहे. मला ही संधी दिल्याबद्दल मी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांचे मनःपूर्वक आभार मानू इच्छितो.”

Z 24 News
Author: Z 24 News

Share करें

✓ Link copy हो गया!

Leave a Comment

और पढ़ें