
अकोला: उमरी येथील स्नेहालय मतिमंद बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा रेणुका घोगरे यांना माणुसकी मल्टीपर्पज फाऊंडेशन बुलडाणा यांच्यातर्फे दिल्या जाणाऱ्या २०२४ चा राजे शिवछत्रपती प्रेरणा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील तालुका शिक्षक संघ पतसंस्था हॉल येथे आठ जुन रोजी दुपारी १२ वाजता प्रमुख अतिथींच्या हस्ते समाजसेविका रेणुका घोगरे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. मतीमंद मुलांसाठी रेणुका घोगरे ह्या वसतीगृह चालवित असून त्यांचा आपल्या मुलांप्रमाणे सांभाळत करतात. त्यांच्या या कार्याची दखल घेत माणुसकी मल्टीपर्पज फाऊंडेशनने त्यांना या पुरस्कारासाठी निवडले असल्याचे संस्थेचे अध्यक्ष विवेक राजापुरे यांनी म्हटले आहे. या निवडीबद्दल समाजसेविका रेणुका घोगरे यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






