
दर्यापूर : सकाळी सव्वा नऊ वाजतची वेळ. घरातील सर्व सदस्य आपल्या कामात व्यस्त. घरातील मोठी मंडळी चहा आणि वृत्तपत्र वाचण्यात दंग. बच्चे कंपनी धिंगाणा घालण्यात व्यस्त अन् काही क्षणाच्या अवधीत घरात मोठा धडाड… धुम… आवाज झाला. काही तरी मोठे घडल्याचा अंदाज आल्याने घरातील सर्वच जण धास्तीने आवाजाच्या दिशेने आले आणि बघतो तर चक्क कचर्याची गाडीच आवार तोडून घरात घुसलेली. सर्वच जण अवाक् होऊन बघू लागले. कचरा गाडीतून फाटक उघडून ड्रायव्हर बाहेर पडताच त्याच्याकडे बघण्यात सर्वच दंग! ही घटना आहे, दर्यापूरमधील साई नगर भागातील.
नगरपालिका क्षेत्रात शहरात कचरा गोळा करण्यासाठी कचरा गाड्यांची व्यवस्था नगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे. मात्र शुक्रवारी सकाळी सव्वा नऊ वाजता कचरा संकलन करणाऱ्या गाडीत अचानक तांत्रिक बिघाड झाला. चालकाला गाडी कंट्रोल न झाल्याने साईनगर प्रभाग क्रमांक 11 मधील रहिवासी अंबादास तायडे यांच्या थेट घरात शिरली. आवाराची भिंत तोडून कचरागाडी थेट त्यांच्या घराच्या आवारामध्येच घुसली. मोठा आवाज झाल्याने सर्वच घाबरले. या घटनेत आवार भिंत, पाण्याची पाईपलाईन, झाडे, कुंड्या आदीचे नुकसान झाले आहे.
या विचित्र अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. माहिती मिळताच नगरपालिका मुख्याधिकारी तथा प्रशासक नंदू परळकर यांनी घटनास्थळी भेट दिली व माहिती जाणून घेत झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने करून देण्यात येईल, असे आश्वासन घर मालक अंबादास तायडे यांना दिले. यावेळी साईनगर परिसरातील नागरिकांनी पाहण्यासाठी मोठी गर्दी केलेली होती. कचरा गाडी चक्क घरात घुसल्यात्ती केलेली होती. कचरा गाडी चक्क घरात घुसल्याची चर्चा मात्र दिवसभर शहरात रंगविली जात होती.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






