Edition

‘त्या’ दुदैवी घटनेतही आरोग्य आयुक्तांचा एवढा अॅटीट्युड का ?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

उद्धवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा सवाल, प्रशासनाच्या पुढ्यात मांडले अनेक जिवंत प्रश्न

 

अमरावती : नवजातांचा मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी घटना असताना राज्याचे आरोग्य आयुक्त डॉ. संजय काटकर अमरावतीला उपस्थित होते. त्यामुळे ते घटनास्थळी भेट देणार, या अपेक्षेने आम्ही अडीच तास प्रतीक्षेत होतो. त्यांच्यासोबत सतत संपर्कात असताना त्यांनी दिशाभूल करणारी उत्तरे दिली. त्यामुळे एवढा अॅटिट्यूड का, असा थेट सवाल उद्धवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काटकर यांना केला.

-चा सुषमा अंधारे, आ. गजानन लवटे, सुधीर सूर्यवंशी, पराग गुडधे, प्रवीण हरमकर यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी यांनी बुधवारी जिल्हा स्त्री रुग्णालयास भेट दिली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे धडक दिली. आरोग्य सेवा आयुक्त डॉ. काटकर तेथे उपस्थित होते. यावेळी अपुऱ्या आरोग्यसेवा व जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या कारभाराबाबत त्यांनी चांगलाच समाचार घेतला. ‘सिलर’ कंपनीच्या व्हेंटीलेटरमध्ये सातत्याने तांत्रिक दोष, स्फोट व अपघात होऊन दुर्दैवी घटना घडत असताना त्या न कंपनीवर प्रशासन एवढे मेहेरबान का, असा सवाल त्यांनी केला. या कंपनीवर आतापर्यंत एफआयआर का दाखल झालेला नाही, असा सवाल उद्धवसेनेचे सुधीर सूर्यवंशी यांनी केला. समितीचा अहवाल प्राप्त होताच जबाबदारी निश्चित होईल, कारवाईही होईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

त्या’ कंत्राटी कर्मचाऱ्यांना घेणार शासन सेवेत जीवाची पर्वा न करता तीन ते चार कंत्राटी आरोग्य सेविकांनी नवजातांना सुरक्षित बाहेर काढले. या कंत्राटी आरोग्य सेविकांना आता नियमित शासन सेवेत घेण्यात येणार आहे, तसा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

-तर ‘त्या’ चार रुग्णालयावरही कारवाई अन्य ३० नवजातांना येथीलच खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या उपचाराचा खर्च राज्य शासन करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेले आहे. मात्र या उपचारासाठी नातेवाईकांकडून रुग्णालय प्रशासन खर्च घेत असल्याचा आरोप उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. यावर चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

पालकमंत्री कुठे आहेत?

‘सीएस’नी डफरीनमधील व्हेन्टिलेटर, अग्निशमन यंत्रणा, इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी पीडब्ल्यूडीकडे केली होती. मात्र टाळाटाळ करण्यात आली. पालकमंत्र्यांना जिल्हा दौरा करण्यासाठी वेळ नाही, असा आरोपही त्यांनी केला. जिल्हा स्त्री रुग्णालयातील व्हेन्टीलेटरचे ऑडिट एका महिन्यापूर्वी केले होते, तरीसुद्धा स्फोट झाला आणि तीन बालकांचा जळून मृत्यू झाला.

चार दिवस उलटले, ‘एफआयआर’ का नाही?

जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या घटनेला चार दिवस लोटल्यानंतरही सीएसकडून अद्याप एफआयआर का देण्यात आला नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सीएसनी यापूर्वी संबंधित विभागाकडे ऑडिट संदर्भात पाठपुरावा केल्याचे पत्र दिले आहे, तसेच जिल्हा स्त्री रुग्णालयातील कामांसाठी ९ कोटींच्या निधीची गरज असल्याचेही जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना कळविले होते. तरीसुद्धा त्याबाबत कुठलीही दखल घेतली नाही आणि ही घटना घडली, त्यामुळे सीएस डॉ. पवार यांनी संबंधितांविरोधात एफआयआर का नोंदविला नाही, त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांचे दडपण आल्याचा आरोप उद्धवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. तीन बालकांचा मृत्यूची नैतिक जबाबदारी स्वीकारून पालकमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी सुषमा अंधारे यांनी केली. सोबतच अंधारे यांनी डफरिनमधील पीओपी पडल्याचे छायाचित्र जिल्हाधिकाऱ्यांना दाखविले.

 

तुम्ही ताम्रपट घेऊन आला का?

डॉ. काटकर यांनी उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना ताटकळत ठेवले. सबब, सुषमा अंधारे संतप्त झाल्या. कोणी काही ताम्रपट घेऊन जन्माला आले नाही, लक्षात ठेवा उद्या आम्ही पण तुमच्या डोक्यावर राहणार आहोत, असे त्यांनी डॉ. काटकर यांना सुनावले. यानंतर जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण घटनाक्रम त्यांना सांगत प्रशासनाद्वारे होत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली

 

 

Z 24 News
Author: Z 24 News

Share करें

✓ Link copy हो गया!

Leave a Comment

और पढ़ें