Edition

तुकाराम मुंढे यांच्याकडे आता नवी जबाबदारी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

विविध प्रकारच्या लसी तयार करणाऱ्या मुंबईतील हाफकिन संस्थेची जागा विक्री केली जाणार नाही, तिचं खासगीकरण केलं जाणार नाही अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली.

 

 

मुंबई: राज्यातील औषध निर्माते, मेडिकल दुकान, हॉटेलवाले तसेच दूध, पनीर भेसळ करणाऱ्यांचे कर्दनकाळ ठरलेले अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्यावर आता नवी जबाबदारी सोपवण्याची घोषणा अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत केली. मुंबईतील हाफकीन बायो फार्म संस्थेच्या आर्थिक स्थितीबाबत ज्योती गायकवाड, विजय वडेट्टीवार, अमिन पटेल, योगेश सागर, अजय चौधरी, रईस शेख, अस्लम शेख, विश्वजीत कदम, विकास ठाकरे, प्रशांत ठाकूर, म्हणून जामसुतकर, सुनील राऊत, अतुल भातखळकर आदी सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी हिरवा यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.

 

विविध प्रकारच्या लसी तयार करणाऱ्या मुंबईतील हाफकिन संस्थेची जागा विक्री केली जाणार नाही, तिचं खासगीकरण केलं जाणार नाही अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. एकेकाळी वैभव असणारी ही संस्था आज डबघाईला आली आहे, तिचं खासगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे तिला वाचवा अशी आग्रही मागणी सर्वच सदस्यांनी केली होती. याबाबत नेमलेल्या डॉ रघुनाथ माशेलकर समितीचा अहवाल देखील सभागृहात सादर करण्यात येईल असं मंत्री म्हणाले.

Z 24 News
Author: Z 24 News

Share करें

✓ Link copy हो गया!

Leave a Comment

और पढ़ें