सकरला येथील दुर्दैवी घटना
आंधळगाव/पालडोंगरी : मोहाडी तालुक्यातील सकरला येथे दि.१६ मार्च २०२५ रोजी सकाळी ८.४५ वाजतादरम्यान दुर्दैवी घटना घडली. घरासमोर खेळत असलेल्या दीड वर्षीय चिमुकल्यास टाटा सुमो वाहनाने धडक दिली. त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुर्गेश मनोहर डोये, असे निरागस मृतक चिमुकल्याचे नाव आहे.
सकरला येथील मनोहर डोये यांचे घर रस्त्यालगत आहे. घटनेच्या दिवशी सकाळी दीड वर्षीय दुर्गेश हा रस्त्यावर खेळत असतांना टाटा सुमो वाहन क्र.एमएच ४० केआर ९७४३ चा चालक अनिल शंकर नागफासे (४०) रा.सकरला याने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालवून खेळत असलेल्या दीड वर्षीय दुर्गेश याला धडक दिली. त्यात त्याचा नाहक बळी गेला. सदर घटनेची नोंद आंधळगाव पोलिसात केली असून पुढील तपास सपोनि सुनील राऊत करीत आहेत.

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com
Post Views: 15