Namo Shetkari Yojana: शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधीची प्रतिक्षा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

माजनोरा  : महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधीच्या धर्तीवर  नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे राज्य सरकारकडून एका वर्षात तीन हप्त्यात २ हजार रुपयाप्रमाणे ६हजार रुपये दिले जातात. नमो शेतकरी महासन्मान  निधी योजनेतून शेतकऱ्यांना आतापर्यंत ५ हप्त्यामध्ये १० हजार रुपये दिले आहे.

राज्यातील जवळपास ९१ लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. एकीकडे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या १९ व्या हप्त्याचे २ हजार रुपये २४ फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे. तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे ३ हजार जागतिक महीला दिनापासून लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होत आहे.  नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013546
error: Content is protected !!