हे लाँचिंग पारंपरिकता आणि ट्रेंड या दोघांचीही उत्तम सांगड घालते, आणि ग्राहकांना दागिन्यांच्या खरेदीत सर्वोत्तम पर्याय मिळतो
अमरावती, 25 मार्च 2026: दागिन्यांच्या किरकोळ विक्री क्षेत्रातील प्रमुख कंपनी कल्याण ज्वेलर्सने पूर्व महाराष्ट्रातील विदर्भ भागात आपल्या कार्याचा धोरणात्मक विस्तार केला आहे. यात अमरावतीत मौजे राजपेठ, सीमा मिलेनियम येथील नवीन शोरूमचा समावेश आहे. बॉलीवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्या हस्ते या शोरूमचे उद्घाटन झाले.
हे लाँच कल्याण ज्वेलर्सच्या महाराष्ट्र बाजारातील वचनबध्दतेचा ठसा उमटवते. जे पारंपरिक कारागिरी आणि आधुनिक खरेदी अनुभव एकत्र करत एक प्रीमियम रिटेल वातावरण प्रदान करते. अमरावतीतील शोरूम हे उत्कृष्ट दागिन्यांसाठी एक सर्वसमावेशक ठिकाण म्हणून डिझाइन केले आहे, ज्यामध्ये ब्रँडच्या सिग्नेचर हाऊस लेबल्सचा विस्तृत पोर्टफोलिओ आहे.
यावेळी बॉलीवूड अभिनेत्री सोनाली बंद्रे म्हणाल्या, “कल्याण ज्वेलर्सच्या या महत्त्वपूर्ण शोरूमचे उद्घाटन करणे ही खूप आनंदाची गोष्ट आहे. ब्रँडचा विश्वास, पारदर्शकता आणि ग्राहक-केंद्रित तत्वज्ञानाबद्दल मला नेहमीच कौतुक वाटत असते. उद्योगात गुणवत्ता आणि कारागिरीसाठी कल्याण ज्वेलर्सने उच्च मानके ठरवली आहेत, आणि मला आनंद आहे की, आता अमरावतीच्या लोकांकडे त्यांच्या दागिन्यांच्या गरजांसाठी हे सुंदर नवीन ठिकाण उपलब्ध आहे.”
या लॉन्चबद्दल श्री. रमेश कल्याणरमन, कार्यकारी संचालक, कल्याण ज्वेलर्स यांनी म्हटले, ”अमरावतीतील आमच्या नवीन शोरूमचे लाँच म्हणजे महाराष्ट्रात विस्ताराचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. चे आम्ही आमच्या ग्राहकांसाठी कल्याण ज्वेलर्सच्या विस्तृत डिझाइन्ससह, गुणात्मक, सेवात्मक आणि पारदर्शकतेचे खास निकष सादर करताना आनंदी आहोत. ग्राहकांचे स्वागत करण्याची आणि त्यांच्या खास क्षणांचा आणि उत्साहाचा भाग होण्याची अपेक्षा करत आहोत.”
या विस्ताराचा आनंद साजरा करण्यासाठी, कल्याण ज्वेलर्सने सर्व वस्तूंवर 0% मेकिंग चार्जेस* जाहीर केले आहेत. याशिवाय, बाजारात सगळ्यात कमी आणि सर्व कल्याण शोरुम्समध्ये समान असलेल्या ब्रँडच्या विशेष सुवर्ण बोर्ड दराची सुविधा मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असेल, ज्यामुळे ग्राहकांना जास्तीत जास्त पारदर्शक किंमत मिळेल याची खात्री होते.
कल्याण ज्वेलर्समध्ये विक्रीसाठी असलेले सर्व दागिने BIS-hallmarked आहेत आणि त्यावर अनेक शुध्दता चाचण्या पार पाडल्या जातात. याशिवाय, ग्राहकांना कल्याण ज्वेलर्सच्या 4-स्तरीय हमी प्रमाणपत्राची ऑफर मिळेल, ज्यामध्ये सोन्याची शुध्दता, आयुष्यभर मोफत देखभाल, उत्पादनाची तपशीलवार माहिती, आणि पारदर्शक अदलाबदल तसेच बाय-बॅक धोरणे यांचा समावेश आहे, जे ब्रँडच्या विश्वासाच्या वचनबद्धतेशी दृढ बांधिलकी दर्शवते.
या शोरूममध्ये कल्याणचे लोकप्रिय हाऊस ब्रँड्ससुद्धा उपलब्ध असतील, ज्यामध्ये मुहूर्त (वेडिंग ज्वेलरी लाइन), मुद्रा (हँडक्राफ्टेड अँटिक ज्वेलरी), निमाह (टेंपल ज्वेलरी), ग्लो (डान्सिंग डायमंड्स), झिया (सोलिटेअरसारखी डायमंड ज्वेलरी), अनोखी (अनकट डायमंड्स), अपूर्वा (विशेष प्रसंगांसाठी डायमंड्स), अंतरा (वेडिंग डायमंड्स), हेरा (रोजच्या वापरासाठी डायमंड्स), रंग (मौल्यवान रत्नांचे दागिने), आणि अलीकडे लॉन्च झालेली लीला (रंगीत दगड आणि डायमंड ज्वेलरी) यांचा समावेश आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com




