नो करप्शन, बी ऑनेस्ट’ जि.प.च्या नव्या सीईओंचा कानमंत्र

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सत्यम गांधी यांनी सोमवारी स्वीकारला सीईओचा पदभार

 

अमरावती : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी संजीता महापात्र यांच्या बदलीनंतर नव्याने मुख्य कार्यपालन अधिकारी सत्यम गांधी यांनी सोमवार ६ एप्रिल रोजी आपल्या पदाचा पदभार अतिरिक्त सीईओ विनय ठमके यांच्याकडून स्वीकारला आहे, पदभार स्वीकारण्याच्या पहिल्याच दिवशी प्रशासनाला जबरदस्त हादरा दिलाय. “करप्नश करताना कोणी आढळलं तर सोडणार नाही” गांधींच्या या इशाऱ्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय यंत्रणेत धाकधूक सुरू झाली आहे.

सांगली, मिराज, कुपवाड महापालिकेचे आयुक्त तथा भारतीय प्रशासकीय सेवेतील २०२० चे तरुण अधिकारी सत्यम गांधी यांनी सोमवारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा प्रभार घेताच ग्राउंड लेव्हलपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला. कुठे फाइल बंद खोलीत बसून आदेश नाहीत, कुठे एसी केबिनमधून सूचना नाहीत. थेट टेबल टू टेबल जाऊन प्रत्येक कर्मचाऱ्याशी संवाद साधला. कोण काय करतोय, कोण कुठे गेले आहे- सगळ्यांची खबरबात सीईओंनी घेतली. त्यांच्या या आकस्मिक व्हिजिटमुळे अनेकांच्या तोंडचं पाणी पळालं असं सांगतात. फिल्ड व्हिजिटला जायचं असेल तर हालचाल रजिस्टरमध्ये नोंद ठेवा. कधीही यावं, कधीही जावं हा उद्योग आता खपवून घेणार नाही. असंही त्यांनी बजावलं आहे. मेळघाटात कोट्यवधींच्या योजना राबवल्या, पण आदिवासींच्या जगण्यात फरक काय पडला? हा खडा सवाल उपस्थित होताच गांधी स्पष्ट यांनी स्पष्ट भूमिका मांडत प्रत्येक योजनेचे प्रगती पुस्तक तपासू, कुठेही अनियमितता आढळली तर गंभीर कारवाई निश्चित, करू असेही त्यांनी माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले. पालघरमधील डहाणू येथील आदिवासी क्षेत्रात काम केलेले गांधी मेळघाटच्या वास्तवाशी अनोळखी नाहीत आणि त्यामुळेच त्यांचा हा नो करप्शन बी. ऑनेस्टचा कानमंत्र त्यांनी दिला. गांधी यांनी जिल्हा परिषद शाळांसाठीही महत्त्वाकांक्षी संकल्प जाहीर केला. गणित-विज्ञान-इंग्रजीची आवड निर्माण करणार, ग्रामीण आदिवासी मुलांना अखिल भारतीय सेवांपर्यंत नेणार, स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी आत्मविश्वास वाढविणार, यासाठी आपले प्रयत्न राहणार असल्याचे गांधी यांनी सांगितले.

हलचल रजिस्टर नोंद, आय कार्ड अन् टेबलवर नेम प्लेट सीईओंनी सोमवारी विविध विभागांत दिलेल्या भेटीदरम्यान काही विभागांचे अधिकारी व कर्मचारी आपल्या जागेवर हजर दिसले नाहीत. अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या कार्यालयात हलचल रजिस्टर ठेवावे, त्यामध्ये दैनंदिन नोंदी ठेवाव्यात. तसेच अधिकारी व कर्मचारी यांनी नेहमी आय कार्डचा वापर करावा, असे निर्देश दिलेत.

नवे सीईओ थेट ‘कनेक्ट’

दालनाची पाहणी करताना त्यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या कामकाजाची माहिती घेतली. मात्र, केवळ फाइल्समध्ये न अडकता त्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन महिला बचत गटांच्या कामाचे कौतुक केले. एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा हा ‘ग्राऊंड टच पाहून झेडपीत कर्मचाऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013449
error: Content is protected !!