जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरळीत, अफवांवर विश्वास ठेऊ नये -जिल्हाधिकारी आशिष येरेकर

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : मध्यपूर्व आशिया, अमेरिका आणि युरोपमध्ये सध्या सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा भासणार नाही. जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा सुरळीत राहील, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली आहे.

भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल या तिन्ही प्रमुख कंपन्यांकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. जिल्हा प्रशासन आणि तेल कंपन्या जिल्ह्यात इंधनाचा साठा कायम राखण्यासाठी समन्वयाने काम करीत आहे. त्यामुळे इंधनाचा तुटवडा होणार असल्याच्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. तसेच, पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धाची परिस्थिती असली तरी, खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने इंधन पुरवठ्याचा आढावा घेतला असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

 

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013449
error: Content is protected !!