‘मेळघाट हाट’मधून महिलांना मिळाली हक्काची बाजारपेठ

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

६० बचतगटांच्या ४७ प्रकारच्या उत्पादनांचा सहभाग

 

अमरावती : . मेळघाटातील दुर्गम भागात कार्यरत स्वयंसहाय्यता महिला बचतगटांच्या उत्पादनांना शहराच्या मध्यवस्तीत विक्रीचे हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आलेले ‘मेळघाट हाट’ विक्री केंद्र महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी ठरत आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परिषद, महिला आर्थिक विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने सायन्सकोर प्रांगणालगत हे आधुनिक विक्री केंद्र ५ जानेवारी २०२५ पासून सुरू आहे. या केंद्रामुळे मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यातील आदिवासी महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे मध्यस्थांची साखळी कमी होत असून बचतगटांच्या उत्पन्नातही वाढ होत आहे. येथे बांबूपासून बनविलेल्या कलाकुसरीच्या वस्तू, रानमेवा, वनौषधी, शुद्ध मध यासह तृणधान्यांमध्ये सावा, कुटकी, ज्वारी, बाजरी, तसेच लाल तांदूळ, तूरडाळ, विविध लोणची आणि चिखलदऱ्याची प्रसिद्ध कॉफी अशी ४७प्रकारची उत्पादने उपलब्ध आहे. पहिल्या टप्प्यात ६० स्वयंसहाय्यता महिला बचतगटांच्या उत्पादनांचा समावेश करण्यात आला असून केंद्रात स्वतंत्र गोदाम, पॅकेजिंग व लेबलिंग युनिटची सुविधा देण्यात आली आहे. आकर्षक पॅकिंग, ब्रँडिंग व मार्केटिंगचे प्रशिक्षणही महिलांना दिले जात आहे. या उपक्रमामुळे आदिवासी महिलांना स्थिर बाजारपेठ मिळणार आहे. मिळून त्यांच्या आर्थिक प्रगतीला निश्चितच चालना मिळत आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013524
error: Content is protected !!