Edition

पाण्यासाठी खणलेला खड्डा तीन वर्षीय चिमुकलीसाठी ठरला काळ

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

चिखलदरा : पाणीपुरवठा, खड्डे आणि नाली कामासाठी घरासमोर खोदलेला खड्डा तीन वर्षाच्या चिमुकलीसाठी काळ ठरला. तालुक्यातील कोरडा ग्रामपंचायत हद्दीत बुधवारी दुपारी १२च्या सुमारास घडली. नायरा संजूलाल भुसूम (३ वर्षे) असे मृत चिमुकलीचे नाव आहे.

कोरडा येथे पाणीपुरवठा आणि नाली कामासाठी अनेक घरांसमोर खड्डे खोदण्यात आले आहेत. पावसाचे पाणी साचल्याने या खड्ड्यांना डबक्यांचे स्वरूप आले आहे. बुधवारी दुपारी चिमुकली नायरा ही घराबाहेर खेळत असताना अचानक तिचा पाय घसरून ती पाणी साचलेल्या खड्यात पडली. खड्ड्यात पाणी जास्त असल्याने गुदमरून तिचा जागीच मृत्यू झाला. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली होती. मेळघाटचे आमदार केवलराम काळे, माजी आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभुदास भिलावेकर यांनी तत्काळ या घटनेची गांभीर्याने दखल घेतली.

 

सरपंच व सचिवावर गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामपंचायत प्रशासन आणि सरपंच सोनाजी सावलकर यांच्या बेफिकिरीमुळे व दुर्लक्षामुळेच या चिमुकलीचा निष्पाप जीव गेल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या दुर्दैवी घटनेस जबाबदार असणारे ग्रामपंचायत सरपंच सोनाजी सावलकर व सचिव यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करावा, अशी आक्रमक मागणी संतप्त आदिवासी गावकऱ्यांनी केली आहे.

 

Z 24 News
Author: Z 24 News

Share करें

✓ Link copy हो गया!

Leave a Comment

और पढ़ें