Edition

चिखलदरा येथे झुल्यावरून कोसळलेला पर्यटक ‘कोमात’

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

विकेंडला चिखलदऱ्यात हजारो पर्यटक आले असून या घटनेमुळे पर्यटनस्थळी मोठी खळबळ उडाली.

 

चिखलदरा : येथील प्रसिद्ध देवी पॉइंट येथे रविवारी घडलेल्या दुर्दैवी अपघातात झुल्यावरून खाली कोसळलेला तरुण पर्यटक कोमामध्ये गेला आहे. त्याच्यावर अमरावती येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नियमबाह्य असलेल्या या झुल्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

अपघातग्रस्त युवकाचे नाव भारत भुजराज मेश्राम (२६, रा. हिवरा बु. ता. नांदगाव खंडेश्वर) असे आहे. वीकएन्डची संधी पाहून तो मित्रांसह आपल्या चिखलदरा पर्यटनासाठी आला होता. देवी पॉइंटवरील विशाल झुल्याचा आनंद घेत असताना अचानक तोल जाऊन तो जमिनीवर कोसळला. या अपघातात त्याच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिक व मित्रांनी तत्काळ त्याला उपचारासाठी चिखलदरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले आणि प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रेफर केले. तेथून त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तो कोमात असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. दरम्यान, चिखलदरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

झुल्याला जागेची परवानगी कुणाची ?

 

देवी पॉइंटच्या जागेवर लावण्यात आलेल्या या सरकारी जागेवर अतिक्रमण करून हे झुले लावण्यात आले. त्यासाठी परवानगी कुणाची ? अपघाताला जबाबदार कोण, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

 

Z 24 News
Author: Z 24 News

Share करें

✓ Link copy हो गया!

Leave a Comment

और पढ़ें