एसीबीच्या शासकीय वाहनातून नेत असताना खिशातील रक्कम बाहेर फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
एसीबीच्या शासकीय वाहनातून नेत असताना खिशातील रक्कम बाहेर फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
नाशिक – सात बारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी पाच हजाराची लाच घेणाऱ्या तलाठ्यासह एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. कारवाईनंतर संशयित तलाठ्याला शासकीय वाहनातून नेले जात असताना त्याने खिशातील लाचेची रक्कम गाडीबाहेर फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.