Edition

एसटी बस-ट्रकची धडक; चार प्रवासी जखमी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमरावती मार्गावरील घटना एसटीचे केबिन चक्काचूर, ट्रकमध्ये होते सिलिंडर

 

मोर्शी : अमरावती-मोर्शी रोडवर एसटी बस व ट्रकच्या धडकेत केबिनचा भाग पूर्णतः चक्काचूर झाला. अपघातात एसटी वाहकासह चार प्रवासी गंभीर जखमी झाले. महिला प्रवाशाजवळ असलेले बालक मात्र सुखरूप बचावले. सिलिंडर वाहतूक करणारा ट्रक हा मोर्शी येथे असलेल्या गोडाऊनकडे रिव्हर्स घेताना ७ जुलै रोजी सकाळी ८ च्या सुमारास शिरभाते मंगल कार्यालयाजवळ हा अपघात घडला. यावेळी सिलिंडरचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडू शकली असती. सुदैवाने कोणत्याही प्रकारची प्राणहानी झाली नाही. जखमींना तात्काळ खासगी व उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

कटारिया गॅस एजन्सीचा हा ट्रक (एमएच २९ बीई ०८९१) गॅस सिलिंडर भरून अमरावती येथून मोर्शीला आला. गोडाऊनमध्ये ट्रकमधील सिलिंडर रिकामे करण्यासाठी चालकाने ट्रक रोडवर घेतला. इंडिकेटर न देता मागे घेण्याचा प्रयत्न करीत असतानाच मोर्शी आगाराची अमरावतीहून २५ ते ३० प्रवासी घेऊन येणाऱ्या एसटी बस (एमएच १४ एमटी ०२७८) ची ट्रकला जोरदार धडक बसली. यामुळे एसटी गाडीचा समोरील केबिनचा भाग काचा फुटून चक्काचूर झाला. या अपघातात एसटी बसमध्ये बसलेल्या प्रवासी आरती पवन गेडाम यांना मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात डोक्याला गंभीर मार बसला. पती पवन गेडाम यांना किरकोळ मार लागल्यामुळे त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पल्लवी सुरेश आगरकर (वय २९, रा. टोपेनगर, अमरावती) व वाहक किशोर मोहोड (वय ३६) यांना गंभीर अवस्थेत उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.

उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार व वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन कोरडे यांनी जखमींवर प्रथमोपचार केला. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येते. या घटनेची माहिती मोर्शीचे ठाणेदार राहुल आठवले यांना दूरध्वनीवरून प्राप्त होताच त्यांनी लगेच घटनास्थळी डायल ११२ वाहन पाठवले. त्याच वाहनातून जखमींना उपजिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले.

Z 24 News
Author: Z 24 News

Share करें

✓ Link copy हो गया!

Leave a Comment

और पढ़ें