Edition

अमरावतीच्या रुग्णालयात आग, तीन नवजात बालकांचा मृत्यू, रवी राणांचा डॉक्टर-कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप, म्हणाले…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुन्हा तेच घडत असेल तर कर्मचारी-डॉक्टरांचा बेफिकीरपणा… रवी राणा अमरावतीच्या दुर्घटनेबाबत काय म्हणाले? अमरावतीच्या रुग्णालयात आग, तीन बालकांचा मृत्यू 

 

 

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात शिशु कक्षाला लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी पहाटे साडेतीन वाजता  नवजात शिशू कक्षात (SNCU) व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन ही आग लागली. ही आग (Fire news) वेगाने पसरली. यानंतर रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी शिशू कक्षात असलेल्या बालकांना बाहेर काढले. ही घटना घडली तेव्हा या कक्षात 9 बालके होती. मात्र, तीन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. उर्वरित बालकांसह संपूर्ण नवजात शिशू कक्षातील इतर बालकांना जवळच असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेनंतर बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी रुग्णालय प्रशासनावर सडकून टीका केली.

 

 

मी सकाळी साडेतीन वाजल्यापासून डॉक्टर आणि इतर लोकांच्या संपर्कात आहे. या आधी तीन वर्षांपूर्वी अशीच आग लागली होती. तेव्हा जुन्या बिल्डिंगमधून नव्या इमारतीत शिफ्ट केलं, तिथे व्यवस्था करुन दिल्या. आज पुन्हा तशीच दुर्घटना झाली. हा रुग्णालयातील कर्मचारी, डॉक्टर आणि व्यवस्थेचा बेफिकीरपणा असल्याचा गंभीर आरोप आमदार रवी राणा यांनी केला.

नवजात बालकांचा अशाप्रकारे मृत्यू होणे दुर्दैवी घटना, याची चौकशी होईल, ज्या ज्या लोकांना जबाबदारीने दिली होती, त्यांनी ती सांभाळायला पाहिजे होती. जेव्हा आग लागली होती पूर्वी तेव्हा मी आणि मुख्यमंत्र्यांनी नवीन इमारतीत सगळ्या व्यवस्था दिल्या, त्रुटी दूर केल्या. जे जे डॉक्टर, नर्स यासाठी जबाबदार आहेत, यांच्यावर कारवाई केली जाईल. आरोग्यमंत्र्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे. फायर ऑडिट झालं नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. फायरब्रिगेडची गाडीही लेट पोहोचली, त्यावरही मी स्वत: कारवाई करणार असल्याचे रवी राणा यांनी सांगितले.

 

 

अमरावतीमधील आजच्या दुर्घटनेमुळे मी खूप दुःखी झालोय, माझं मन हेलावून गेलंय: चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील या आगीच्या घटनेनंतर राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल  मीडियावर पोस्ट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी म्हटले की, अमरावतीमधील आजच्या दुर्घटनेमुळे मी खूप दुःखी झालो. माझे मन हेलावून गेले आहे. दगावलेल्या नवजात बालकांना अतिशय व्यथित अंतःकरणाने श्रद्धांजली व्यक्त करतो. त्यांच्या पालकांना हे दुःख सहन करण्याची ताकद ईश्वर देवो, अशी प्रार्थना करतो. या घटनेच्या संपूर्ण चौकशीचे आदेश मी दिले आहेत. जे जखमी झाले त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना सर्व प्रकारची वैद्यकीय सहायता दिली जात असून, त्यांना लवकर आराम पडावा अशी सुविधा दिली जात आहे.

मृत बालकांच्या नातेवाईकांच्या पाठीशी सरकार उभे असून, सरकार व प्रशासन संपूर्ण मदत करत आहे.  मी जिल्हा प्रशासनाच्या सतत संपर्कात असून, आवश्यक त्या सर्व सूचना दिल्या आहेत. प्रशासन पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली. जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील नवजात शिशू अतिदक्षता विभागात (एसएनसीयू) सोमवारी पहाटे चार वाजता लागलेल्या आगीत उपचार घेत असलेल्या तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला. काही बालकांना पुढील उपचारांसाठी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांपैकी चार बालकांवर उपचार सुरू असून, एक गंभीर आहे.

आग लागताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी धावपळ करीत इतर बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. आगीचे नेमके कारण अजून समजू शकलेले नाही. एसएनसीयूमध्ये कमी दिवसांचे, कमी वजनाचे आणि गंभीर अवस्थेतील नवजात बालकांवर उपचार सुरू असतात. मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या घटनेचे तीव्र दुःख व्यक्त करतो.

Amravati news: यशोमती ठाकूर यांच्याकडून चौकशीची मागणी

जुन्या बिल्डिंगमध्ये काही दोष होते, म्हणून या नवीन बिल्डिंगचं नियोजन केलं. त्यात मोठ्या प्रमाणावर बेड्स उपलब्ध करून दिले. NICU ची व्यवस्था केली. पण इथे जर इनव्हर्टर सप्लाय किंवा कनेक्शन सप्लायमधे हलगर्जीपणा झाला असेल तर त्याला माफ करता येणार नाही, असे वक्तव्य यशोमती ठाकूर यांनी केले . सप्लायर कोण होता, इनव्हर्टरमध्ये दोष होता का, व्हेंटिलेटरमध्ये दोष होता का याची चौकशी व्हायला पाहिजे, असेही  त्यांनी म्हटले.

Z 24 News
Author: Z 24 News

Share करें

✓ Link copy हो गया!

Leave a Comment

और पढ़ें