Edition

नामांकित : एका विद्यार्थ्यावर ७० हजारांचा खर्च; पण सुविधा शून्य!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

महर्षी पब्लिक स्कूलमधील ‘त्या’ आदिवासी विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर खळबळ

 

 अमरावती:   शहरातील महर्षी पब्लिक स्कूलमध्ये मेळघाटातील आदिवासी विद्यार्थी राजेश बेठेकर याच्या संशयास्पद मृत्यूने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. शासनाकडून अनुदानाच्या स्वरूपात मोठी मोजूनही आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या गंभीर घटनेची दखल घेत अमरावतीचे आदिवासी अप्पर आयुक्त संदीप गोलाईत यांनी मंगळवारी थेट महर्षी पब्लिक स्कूलमध्ये धडक देत पाहणी केली. यावेळी शाळेतील दुरवस्था पाहून त्यांनी संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांची चांगलीच कानउघाडणी केली.

किचनमध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य, सीसीटीव्ही गायब अप्पर आयुक्त संदीप गोलाईत यांनी शाळेत भेट देऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांचे निवासस्थान आणि किचनची पाहणी केली. या पाहणीदरम्यान किचन आणि निवास व्यवस्थेमध्ये प्रचंड अस्वच्छता आढळून आली. धक्कादायक बाब म्हणजे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक असलेले सीसीटीव्ही कॅमेरे संपूर्ण शाळेत कुठेच कार्यान्वित नसल्याची माहिती प्रशासनाने दिली. दरम्यान ‘महर्षी पब्लिक स्कूल’ची मान्यता रद्द करून गुन्हे दाखल करावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.

 

…तर ७० हजार रुपये जातात कुठे?

शासकीय नियमांनुसार, नामांकित शाळा योजनेंतर्गत प्रवेशित एका आदिवासी विद्यार्थ्यावर सरकारकडून प्रतिवर्ष तब्बल ७० हजार रुपये खर्च केले जातात. सरकार एवढा मोठा निधी देत असतानाही सुविधांऐवजी हा पैसा नेमका जातो कुठे, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

२० ऑगस्टपासून आंदोलन; हायकोर्टात धाव घेणार संबंधित दोषी संस्थाचालकावर तातडीने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व शाळेची मान्यता तात्काळ रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी २० ऑगस्टपासून जिल्हाभरात तीव्र जनआंदोलन छेडू तसेच नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल करू, असा इशारा मन्ना दारसिंबे आणि अर्जुन युवनाते यांनी दिला.

 

निष्काळजीपणामुळेच मृत्यू: नेत्यांचा आरोप आदिवासी नेते मन्ना दारशिंबे आणि अर्जुन युवनाते यांनी महर्षी पब्लिक स्कूलला प्रत्यक्ष भेट देत विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. यानंतर शाळा प्रशासनाच्या निष्काळजी वृत्तीमुळेच निष्पाप राजेशचा बळी गेला, असा थेट आरोप त्यांनी केला. एका विद्यार्थ्यावर वर्षाला ७० हजार रुपये खर्च होत असतानाही त्यांना विषारी आणि अस्वच्छ अन्न दिले जात असल्याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

सखोल चौकशीनंतर कठोर कारवाई होणार! राजेश बेठेकरच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर समोर येईल. मात्र, शाळेतील अस्वच्छता, सुविधांचा अभाव ही गंभीर बाब आहे. या प्रकरणी सखोल चौकशी केली जाईल आणि दोषी आढळल्यास शाळा प्रशासनावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी भूमिका आदिवासी अप्पर आयुक्त संदीप गोलाईत यांनी स्पष्ट केली.

 

 

 

Z 24 News
Author: Z 24 News

Share करें

✓ Link copy हो गया!

Leave a Comment

और पढ़ें