Edition

‘नो एन्ट्री’मध्ये विना नंबर ट्रक कसा शिरला?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमरावती (प्रतिनिधी) दि. २९ राजापेठ उड्डाण पुलावरील भीषण अपघातात हर्षा गावंडे व गौरी धर्माळे या दोन महिलांचा मृत्यू झाल्यानंतर युवा स्वाभिमान पार्टीने प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांना निवेदन देत विना नंबर ट्रकचा चालक व मालकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची, तसेच संबंधित आरटीओ व वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली.

मनो एन्ट्रीफ्मध्ये विना नंबर ट्रक शहरात कसा शिरला, याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. ट्रकची नोंदणी, फिटनेस, विमा, परमिट व इतर कागदपत्रांची तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाखांची मदत द्यावी, अपघातप्रवण ठिकाणी सुरक्षा उपाययोजना वाढवाव्यात, विना नंबर वाहनांवर विशेष मोहीम राबवावी आणि आरटीओ व वाहतूक पोलिसांच्या निष्काळजीपणाची चौकशी करून दोषींवर कायदेशीर

कारवाई करावी, अशी मागणी युवा स्वाभिमान पक्षाने केली. निवेदन देताना उपमहापौर सचिन भेंडे, पक्षाचे मार्गदर्शक सुनील राणा यांच्यासह अॅड. प्रिती रेवने, प्रकाश साबळे, सोनाली नवले, नाना आमले, प्रशांत वानखडे, सुमती ढोके, अजय जयस्वाल, किशोर जाधव, रजनी डोंगरे, गौरी मेघवानी, प्रियंका भुषण पाटने, अर्चना पांडे, योगेश विजयकर, नंदा सावदे, महेश मुलचंदानी, मिरा कांबळे, दिपक साहु (सम्राट), संजय हिंगासपुरे, उमेश ढोणे, नितीन बोरेकर, विनोद जायलवाल, ज्योती सैरीसे, विनोद गुहे, राजा बांगडे, आशिष गावंडे, मिलींद कहाळे, अनुप अग्रवाल, तुषार दुधे, पराग चिमोटे, बाळु इंगोले, महेश किल्लेकर, भुषण पाटने, संदीप कांबळे, राजा बांगडे, देवा शेंडे, शैलेश मेघवानी, अमोल इंगळे, सुरज मिश्रा, चंदु जावरे, उदय पर्वतकर, अविनाश काळे, पंकज सुरडकर, अश्विन उके, चंदा लांडे, अर्चना तालन, वंदना जामनेकर, लता अंबुलकर, सुनिता राऊत, निता खडसे, साक्षी उमक, शोभा किटके, किर्ती लोरे, अजय घुले, अशोक पांडे, छोटू आकोटकर, सुरज मिश्रा, अविनाश घाडगे, महेश किल्लेकर, श्याम कथे, राहुल काळे उपस्थित होते.

Z 24 News
Author: Z 24 News

Share करें

✓ Link copy हो गया!

Leave a Comment

और पढ़ें