Edition

१३ कोटींचा हप्ता, २ कोटींचा परतावा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पीक विम्यात कंपनीचा डल्ला, शेतकऱ्यांना ठेंगा : ‘एल निनो’चे सावट असताना यंदा योजनेला फटका

 

अमरावती : गतवर्षी सरासरीपेक्षा जास्त पावसाने खरिपाचे मोठे नुकसान झाले. पैसेवारीही ५० पैशांच्या आत आहे. पाच लाख हेक्टर बाधित पिकांना शासनाने निकषाबाहेर जाऊन मदत केली. अशा परिस्थितीत सरसकट पीक विमा परतावा मिळणार, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र १३.१४ कोटींचा प्रीमियम असताना, विमा कंपनीद्वारा फक्त २ कोटींचा परतावा शेतकऱ्यांना दिला. त्यामुळे यंदा पीक विम्यात सहभागासाठी शेतकऱ्यांचा फारसा कल नसल्याचे दिसून येते.

यापूर्वीच्या पीक विमा योजनेतील महत्त्वाचे चार ट्रिगरदेखील नव्या योजनेत बाद केले व शेतकऱ्यांचा एक रुपयात सहभागही बंद करण्यात आला. शिवाय प्रत्येक जिल्ह्यात पीक विमा कंपनी वेगळी असल्याने विमा हप्ता दरांमध्ये देखील तफावत आहे. त्यामुळे पीक विम्यासाठी ३१ जुलै हा शेवटचा दिवस असताना, सध्या फक्त ७२,४०१ शेतकऱ्यांचे अर्ज सहभागासाठी प्राप्त

झाले आहेत. त्यामुळेच योजनेला पुन्हा १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची शेतकऱ्यांची माहिती आहे. गतवर्षी पीकविमा योजनेत १.८५ लाख, तर दोन वर्षापूर्वी ५.१८ लाख शेतकरी सहभागी झाले होते, हे येथे उल्लेखनीय. नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी पीक विमा योजना राबविण्यात येते. यावर्षी मान्सून विलंबाने आल्याने पेरणीला उशीर झाला, त्यातच ‘एल निनो’चे सावट असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभाग वाढेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात ३१ जुलै हा शेवटचा दिवस असतानाही शेतकऱ्यांची योजनेकडे पाठ असल्याचे दिसून आले.

महत्त्वाचे चार ट्रिगर योजनेत यावेळी बाद यापूर्वीच्या पीक विमा योजनेत असणारे चार महत्त्वाचे ट्रिगर नव्या योजनेत बाद करण्यात आले आहेत. त्याऐवजी फक्त पीक कापणी प्रयोगासह अन्य एक ट्रिगर या योजनेत समाविष्ट आहे. त्यामुळे खरिपाच्या पिकांचे नुकसान झालेले असताना, तांत्रिक निकषाच्या आधारे विमा कंपन्यांद्वारा परतावा देण्यास नेहमीच टाळाटाळ केली जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

 

गतवर्षी सोयाबीनचे मोठे नुकसान झाल्याने विमा कंपनीला तक्रार दिली होती. त्यामुळे तीन एकरातील सोयाबीनची भरपाई मिळेल, अशी अपेक्षा होती, प्रत्यक्षात परतावा मिळालेला नाही.

बाळासाहेब खंडारे, शेतकरी.

गतवर्षी १.८५ लाख सहभाग, परतावा फक्त २३६ शेतकऱ्यांना गतवर्षी या पीक विमा योजनेत जिल्ह्यातील १,८५,३२४ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. यासाठी ८.९० कोटींचा प्रीमियम भरला. याशिवाय राज्य व केंद्र शासनाचा प्रत्येकी २.१२ कोटी, असा एकूण १३.१४ कोटींचा प्रीमियम कंपनीकडे जमा झाला.

‘यील्ड बेस’वर फक्त २३६ शेतकऱ्यांना २.३६ कोटींचा परतावा देण्यात आला. यामध्ये नऊ तालुक्यांतील एकाही शेतकऱ्याला परतावा मिळालेला नाही.

पीक विमा योजनेची सद्य:स्थिती (३१ जुलै)

कर्जदारांचे अर्ज १३,४४८

गैरकर्जदारांचे अर्ज ५८९५३

एकूण अर्ज ७२,४०१

शेतकरी हिस्सा ६.९५ कोटी

शासन हिस्सा २.५८ कोटी

Z 24 News
Author: Z 24 News

Share करें

✓ Link copy हो गया!

Leave a Comment

और पढ़ें