दर्यापुरात टोळक्याचा धुमाकूळ; अमरावती मार्गावर चालत्या वाहनांवर दगडफेक

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

दर्यापूर (अमरावती): अमरावती मार्गावर असलेल्या पेट्रोल पंपानजीक असलेल्या खाद्यपदार्थांच्या आठ ते नऊ जणांच्या टोळक्याने धुमाकूळ घालत हॉटेल मालकाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यातील काहींनी दर्यापूर-अमरावती मार्गावर धावणाऱ्या काही चालत्या वाहनांवर दगडफेक करीत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी सायंकाळी ७ च्या सुमारास घडली.अमरावती मार्गावरील एका बारमध्ये मद्यपान करून दुचाकीने निघालेल्या टोळक्याने मार्गात पेट्रोल पंपानजीक असलेल्या एका खाद्यपदार्थाच्या हॉटेलमध्ये शिरून तेथे मालकाला दमदाटी केली व शस्त्र काढून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी अमरावती मार्गावरील धावत्या वाहनांवर तुफान दगडफेक केल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकारामुळे काही काळ त्या ठिकाणी दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. दर्यापूर पोलिसांना माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. मात्र, तोपर्यंत टोळक्यातील काही जण पसार झाले. त्यातील दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हे टोळके अमरावती येथील असल्याचे सांगितले जात आहे. तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सदर घटनेमुळे दर्यापूर शहरात खळबळ उडाली आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013600
error: Content is protected !!