Edition

कुसुमकोट डीएपी प्रकरण; अधिकारी, तस्करांचे थेट ‘कॉल डिटेल्स’ तपासा !

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जि.प. कृषी भरारी पथकाचे मेळघाटात धाडसत्र

 

 

अमरावती : मलकापूरहून निघालेले

खताचे ट्रक धारणीत न येता थेट मध्य प्रदेशात कसे गेले? याची पावती व नोंद स्टॉक रजिस्टरमध्ये आहे का? या कृषी केंद्रात गेल्या ३ वर्षांत मलकापूरवरून किती डीएपी खत आले आणि प्रत्यक्षात ते किती शेतकऱ्यांना विकले गेले, याची कसून चौकशी होणे गरजेचे आहे.

मध्य प्रदेशात हे खत प्रति पोते २००० रुपये या चढ्या दराने विकले जात होते. यात कृषी केंद्र मालक आणि धारणीचे दोन कृषी अधिकारी यांचे थेट साटेलोटे असल्याची शंका आहे. त्यामुळे या संशयित अधिकाऱ्यांचे ‘कॉल डिटेल्स’ आणि कुसुमकोट मुख्य रस्त्यावरील आउटलेटची चौकशी करणे गरजेचे आहे. खताचा परवाना, साठा तपासणे आणि ई-वे बिलावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी आणि गुण नियंत्रण निरीक्षकांची भूमिका या प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात आहे.

 

सात दिवस कानाडोळा, वृत्त झळकताच धावपळ !

मध्य प्रदेशातील खालवा येथे धारणीतून तस्करी करून नेलेली तीन ट्रक आणि तब्बल १५०० पोती डीएपी खत पकडले गेले होते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊनही धारणी कृषी कार्यालयाने तब्बल सात दिवस या गंभीर प्रकरणाकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला. मात्र, या साटेलोट्याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त झळकताच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आणि त्यांनी तडकाफडकी चौकशीचे आदेश दिले.

केवळ कागदोपत्री पंचनामा करून हे गंभीर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. यात सामील असलेल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई आणि दोषींवर फौजदारी कारवाई व्हावी.

श्रीपाल पाल, अध्यक्ष, धारणी, खविसं

 

३० लाखांच्या डीएपी फ्रॉडचा होणार भंडाफोडर

 

मेळघाटच्या गरीब शेतकऱ्यांच्या हक्काच्या ३० लाख रुपये किमतीच्या डीएपी खत तस्करीचे रॅकेट ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर अखेर झोपेचे सोंग घेतलेल्या कृषी विभागाला जाग आली आहे. कृषी विभागाच्या भरारी पथकाने रविवार, २ नोव्हेंबरला कुसुमकोट येथील कृषी सेवा केंद्र आणि त्यांच्या गोडाऊनवर अचानक छापा टाकला. रविवारच्या सुट्टीच्या दिवशी झालेल्या या धडक कारवाईने खळबळ उडाली आहे.

जिल्हा परिषद कृषि विभागाच्या भरारी पथकाने कुसुमकोट येथील कृषि केंद्राची तपासणी केल्याची माहिती आहे. या पथकात किती जण समाविष्ट होते, याबाबत अद्याप सांगता येणार नाही.

राहुल सातपुते,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

 

Z 24 News
Author: Z 24 News

Share करें

✓ Link copy हो गया!

Leave a Comment

और पढ़ें