Edition

१२ तालुक्यातील भूजल पातळीत तूट; कशी निघणार भरून? पाणीटंचाईचे संकट गडद !

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जिल्ह्यात १३४ निरीक्षण विहिरींच्या नोंदीतील वास्तव, चिंता वाढली

 

अमरावती : भूजल सर्वेक्षण विभागाद्वारा (जीएसडीए) जिल्ह्यातील १३४ निरीक्षण विहिरींतील पाणी पातळीच्या नोंदी घेतल्या. यामध्ये १२ तालुक्यातील भूजलात पाच वर्षांतील सरासरीच्या तुलनेत तूट आल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. त्यातच यंदा ‘एल-निनो’ चा तीव्र प्रभाव राहण्याची शक्यता असल्याने, ही भूजलातील तूट कशी भरून निघणार आणि ग्रामीण भागाची तहान कशी भागणार, असा प्रश्न समोर आला आहे. जिल्ह्यामध्ये संपून उन्हाळा पावसाळा सुरू झाला तरी पाणी पातळीत वाढ झालेली नाही. जिल्ह्यातील एकूण १४ तालुक्यांपैकी अनेक भागात मागील पाच वर्षाच्या सरासरीच्या तुलनेत जुनमध्ये भूजल पातळीमध्ये लक्षणीय घट नोंदवली गेली आहे.

 

धारणी, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर आणि अंजनगाव सुर्जी या तालुक्यांमध्ये भूजल पातळी कमी आलेली आहे. तर उर्वरित तालुक्यांमध्येदेखील पाण्याच्या अति-उपशामुळे भविष्यात संकट गंभीर होण्याची चिन्हे आहेत.

यंदा ‘एल-निनो’च्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण अनिश्चित राहण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत भूजल पुनर्भरण नैसर्गिकरीत्या होणे कठीण जाईल. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर व जलसंधारण होणे महत्त्वाचे आहे.

तालकानिहाय भूजलाची स्थिती ‘जीएसडीए’च्या अहवालानुसार सर्वाधिक भूजलात घट अंजनगाव सुर्जी (उणे ०.४६ मी), धारणी तालुक्यात (उणे ०.४५मी), नांदगाव (उणे ०.११ मी) तर धामणगाव तालुक्यात (उणे ०.०९ मी.) आहे. याशिवाय अमरावती (०.३७), अचलपूर (१.४३), भातकुली (०.९६), दर्यापूर (१.३०), चांदूर रेल्वे (०.७३), चांदूरबाजार (०.३०), चिखलदरा (०.६०), तिवसा (०.३०), मोर्शी (०.६१), नांदगाव (०.११) वरुड (०.५५मी.) भूजल पातळी आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

Share करें

✓ Link copy हो गया!

Leave a Comment

और पढ़ें