या मुलींना कल्याण रेल्वे स्थानकापर्यंत कसे आणि कोणी नेले. या मुलींनी राजस्थापनपर्यंतचा प्रवास कोणा सोबत केला यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत.
कल्याण शहरातील दुर्गाडी किल्ला परिसरातील एका शाळेतील चार मुली शाळा सुटल्यानंतर दोन दिवसापूर्वी बेपत्ता झाल्या होत्या. या मुलींच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल होताच, कल्याणच्या पोलिसांनी चार विशेष पथके तयार करून या मुलींचा शोध सुरू केला. या चारही मुली राजस्थानातील मारवाड रेल्वे स्थानकात सापडल्या असल्याची माहिती कल्याणचे साहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांनी दिली.









