अमरावती : दहावीतील शाळकरी विद्यार्थिनीचा शाळेच्या वाटेवर पाठलाग व छेडखानी करणाऱ्या युतकाविरुद्ध सोमवारी दत्तापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिस सूत्रांनुसार, धीरज वहिले (२०) असे आरोपीचे नाव आहे. पीडित १५ वर्षीय मुलगी ही दररोज पायी शाळेत ये-जा करते.
त्यावेळी धीरज हा तिचा पाठलाग करतो. ३ फेब्रुवारी रोजी तो तिचा पाठलाग करीत होता. त्यावेळी तो अचानक तिच्या जवळ आला. तुझे घर कुठे आहे, तू इथेच राहते का, अशी विचारणा त्याने केली.
तिने त्याकडे दुर्लक्ष केले. त्याचवेळी धीरजने तिला आवाज देऊन मी तुला पाहून घेईन, अशी धमकी दिली. घाबरलेल्या मुलीने याबाबत आपल्या वडिलांना माहिती दिली. पीडित मुलीचे वडील व भाऊ धीरजच्या शोधात एका पानटपरीवर पोहोचले. त्यांना बघून धीरज हा तेथून पळून गेला. त्यानंतर पीडित मुलीने दत्तापूर ठाणे गाठून तक्रार दिली.

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com