
अमरावती : येथील विभागीय आयुक्तपदी श्वेता सिंघल यांची नियुक्ती शासनाद्वारा मंगळवारी करण्यात आली. त्या २००९ च्या सिव्हिल सर्व्हिस बॅचमध्ये १७ व्या रैंकधारक आहेत. यापूर्वी सिंघल यांनी राजभवनात सचिव व सातारा जिल्हाधिकारी म्हणूनही काम केले. त्या उत्कृष्ट प्रशासक परिचित आहेत. यापूर्वी ४ मार्च २०२३ पासून विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय कार्यरत होत्या. पाण्डेय २६ डिसेंबर २०२४ पासून रजेवर आहेत. त्यांची पदस्थापना अद्याप प्रतीक्षेत आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com
Post Views: 148





