*”हे बाळा” मराठी साँग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला*

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

श्रीकांत नाथे अंजनगाव सुर्जी :बी.मयुरेश दिग्दर्शित “हे बाळा” हे मराठी गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालतात. तर आता नुकतेच “हे बाळा” या मराठी गाण्याचे पोस्टर रिलीज झाले आहे. “हे बाळा” हे मराठी गाणं लवकरच मायबोली या मराठी पडद्यावर येत्या 7 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
बी.मयुरेश दिग्दर्शित “हे बाळा” या गाण्यामध्ये अंजनगाव सुर्जी येथील अभिनेता सुरज मुरकुटे व सांगली येथील अभिनेत्री सायली वाघमारे यांनी या गाण्यामध्ये काम केलेले आहे. या गाण्याचं शूटिंग विदर्भाचे नंदनवन चिखलदरा येथे करण्यात आले असून “हे बाळा” हे मराठी साँग मायबोली या मराठी चॅनलच्या पडद्यावर येत्या 7 फेब्रुवारीला आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. तर हे बाळा या गाण्याला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देतील अशी आशा पत्रकार परिषदेत बी.मयुरेश यांनी व्यक्त केली आहे.
यावेळी दिग्दर्शक बी.मयुरेश, अभिनेता सुरज मुरकुटे, अभिनेत्री सायली वाघमारे, मायबोली चॅनल हेड अरविंद दर्वेश, डीओपी सोपान सगणे, सह दिग्दर्शक एच सुरज, अभिषेक, विवेक तायडे, सिंगर ऐश्वर्या खंडारे, आणि रॅप बी मयुरेश, म्युझिक डायरेक्टर वासुकी वक्ते, प्रोडक्शन मॅनेजर सुमित भावे, प्रज्वल येऊल, प्रज्वल गंगाळे, अभिषेक मानकर, कॉस्ट्यूम डिझायनर राजश्री वाळके, राहुल ढवळे, शाडो, शैलेश मेश्राम, तेजस्वी उंद्रे, पवन धांडे, पंकज सालमुटे व संपूर्ण टीम यावेळी उपस्थित होती.
“हे बाळा” सोबतच हे गणराया, माझी रमा, माया बाप, माझी नवरी, पहिली पहाट, मोत्याची चोरी, प्रेमाचा भट्टा, तुझी नजर, 402, प्यार पाहिजे, माझी राधा, दि हार्ड डिस्क, तुझ्या प्रेमाची आस, हिर रांझा, तुझ्या वेणीतलं फुल, पैजनी, सुफियाना इश्क, प्लग इन, नखरेवाली, वायफाय अश्या असंख्य मराठी गाणी, शॉर्ट फिल्म बी.मयुरेश यांनी आतापर्यंत आपल्या आवडत्या प्रेक्षकांसाठी केलेली आहेत.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013550
error: Content is protected !!