Co-operative Bank Scam: न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेत 122 कोटींचा घोटाळा, ग्राहकांचे पैसे बुडाले!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

 

मुंबई  : मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडबाबत नवीन खुलासे होत आहेत. न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे.  बँकेचे माजी महाव्यवस्थापक हितेश प्रवीण चंद मेहता यांच्यावर 122 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. मुख्य लेखा अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून  दादर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हितेश प्रवीणचंद  यांच्यावर त्यांच्या पदाचा गैरवापर करून दोन्ही शाखांच्या खात्यांमधून 122 कोटी रुपये गंडा घातल्याचा आरोप आहे. सध्या  पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आर्थिक अनियमिततेसह अनेक बाबींवर रिझर्व्ह बँकेने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवर कडक निर्बंध लादले आहेत.

 

 

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेचा घोटाळा कधी आणि कसा?

पोलिसांच्या  म्हणण्यानुसार, हा घोटाळा 2020 ते 2025 दरम्यान झाला. बँकेच्या मुख्य लेखा अधिकाऱ्यांनी पोलिस तक्रारीत म्हटले आहे की, हा घोटाळा दादर आणि गोरेगाव शाखांमध्ये झाला आहे. हितेश प्रवीणचंद मेहता दादर आणि गोरेगाव शाखांचे महाव्यवस्थापक असताना दोन्ही शाखांमधील खात्यांमध्ये फेरफार करून 122 कोटी रुपयांचा अपहार करण्यात आला.

माजी महाव्यवस्थापक हितेश प्रवीणचंद मेहता  यांनी बँकेच्या तिजोरीतून 122 कोटी रुपये काढले असल्याचा आरोप आहे. अहवालांनुसार,  बँकेत ठेवलेल्या पैशांचे हिशेब खात्यांच्या पुस्तकात नोंदवले जातात. जेव्हा हिशेबाची पुस्तके तपासली गेली, तेव्हा दोघांमध्ये 122 कोटी रुपयांचा फरक आढळून आला. यानंतर तक्रार दाखल करण्यात आली, ज्याच्या आधारे हितेश मेहताविरुद्ध FIR दाखल करण्यात आला. या प्रकरणात, EOW ने बँकेच्या खात्यांच्या पुस्तकांची माहिती घेतली आहे, ज्याची फॉरेन्सिकली तपासणी केली जाणार आहे.

इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्याबाबत अनेक खुलासे

या  घोटाळ्यात हितेशसोबत आणखी एका व्यक्तीचाही सहभाग असल्याचे समोर येत आहे. आता पोलिसांनी या प्रकरणात एफआयआर नोंदवला आहे आणि हितेश प्रवीणचंद मेहता  यांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहेत. माजी महाव्यवस्थापक हितेश प्रवीणचंद मेहता यांच्या चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे होऊ शकतात, असे सांगितले जात आहे.

त्याच वेळी, पोलिसांनी  बँक फसवणुकीचा खटला आर्थिक गुन्हे शाखेकडे म्हणजेच EOW कडे हस्तांतरित केला आहे. आता EOW पुढील तपास करेल. EOW च्या तपासादरम्यान, हा घोटाळा करण्यासाठी कोणत्या पद्धती वापरल्या गेल्या आणि त्यात किती लोक सामील होते हे कळेल. याशिवाय, बँकेने त्यांचे सुरक्षा प्रोटोकॉल आणि नियमांचे पालन केले होते का, किंवा यामध्ये काही निष्काळजीपणा झाला आहे का, याचीही चौकशी केली जाणार आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Our Visitor

0 5 0 3 1 5
Users Today : 3
Users This Month : 327
Total Users : 50315
error: Content is protected !!