परतवाडा डेपोतील लहान मुलांची सहल घेऊन जाणाऱ्या एम एच १४ ए क्यू ६१६४ क्रमांकाच्या बसचे चाक निघाल्याची आज दि.१६ फेब्रुवारी रोजी रिद्धपूर जवळ घडली आहे.मात्र केवळ दैव बलवत्तर होते म्हणून मोठी प्राणहानी टळली,असेच म्हणावे लागेल.यापूर्वी परतवाडा ते पुणे शिवशाही शयनयान एम एच १४ एल बी २३४४ क्रमांकाच्या बसचे चिखली नजीक ९ फेब्रुवारी रोजी चाक निघाल्याची घटना घडली होती.
परतवाडा डेपोच्या बसेस मध्ये वारंवार अशा घटना घडत असून त्यामुळे दुर्दैवाने एखादी प्राणघातक घटना घडून प्रवाशांचे जीव गेले तर त्याला जबाबदार कुणाला धरावे असाच प्रश्न आज प्रवाशांना पडला आहे.
गेल्या ९ फेब्रुवारीच्या घडलेल्या घटनेत तांत्रिक विभागाच्या दोन कर्मचाऱ्याचे निलंबन तर एका कर्मचाऱ्याला आरोपपत्र बजावण्यात आले होते. परंतु वारंवार परतवाडा बस डेपोमधील तांत्रिक विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यात कामचुकारपणा, अनियमितता आढळून येत असल्याने कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यात आगार व्यवस्थापक जीवन वानखडे कारणीभूत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात असून प्रवाश्यांमधे असंतोषाचे वातावरण पसरले आहे. आता वारंवार घडत असलेल्या घटनेविरोधात विभाग नियंत्रक निलेश बेलसरे “स्ट्रिक्ट ॲक्शन” घेऊन प्रवाशांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या आगार व्यवस्थापकाचे निलंबन करणार का? याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com
Post Views: 199






