अमरावती : वीज ग्राहकांनी बिल भरण्यासाठी दिलेल्या धनादेश (चेक) बाऊन्स होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे संबंधित वीज ग्राहकाला प्रत्येक वीजबिलासाठी विलंब आकार अधिक जीएसटी करासह ८८५ रुपयांचा दंड पुढील तीजबिलामध्ये समाविष्ट होतो.
तीन महिन्यांत ३९३ वीज ग्राहकांचे चेक बाऊन्स जिल्ह्यात नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्यांच्या कालावधीत ३९३ ग्राहकांचे चेक बाऊन्स झाले. यात अमरावती शहर १५६, ग्रामीण ७७, अचलपूर १२०, मोर्शी येथील ४० धनादेशांचा समावेश आहे.
₹८८५अतिरिक्त शुल्क चेक बाऊन्स झाल्यास प्रत्येक वीजबिलासाठी विलंब आकार अधिक जीएसटी करासह ८८५ रुपयांचा दंड संबंधित ग्राहकाच्या पुढील महिन्याच्या वीजबिलामध्ये इतर आकार म्हणून समाविष्ट करण्यात येत असल्याची माहीती महावितरणने दिली.
बिल भरण्यासाठी ऑनलाइन पर्याय महावितरणने बिलाचा भरणा करण्यासाठी मोबाइल अॅप तसेच इतर ऑनलाइन पर्याय ग्राहकांना उपलब्ध केले आहेत. तसेच ऑनलाइन भरणा केल्यास ०.२५ टक्के तसेच ५०० रुपयांच्या मर्यादपर्यंत वीजबिलात सूटदेखील देण्यात येते. त्यामुळे ग्राहकांनी वरील ऑनलाइन पर्यायांचा वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
चेक जमा करण्यासाठी पाच दिवसांची मुदत धनादेश दिल्यानंतर तो जमा होण्यासाठी साधारणतः तीन ते पाच दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे धनादेशाची रक्कम जमा झाल्याच्या तारखेलाच किंवा चेक जमा केल्यापासून तिसऱ्या दिवशी भरणा ग्राह्य धरला जातो.
चेकने बिलाचा भरणा करताना अनेकवेळा चेक बाऊन्स होतात. संबंधित ग्राहकाला अतिरिक्त शुल्क दंडाच्या स्वरूपात भरावे लागते. ग्राहकांनी बिल भरण्यासाठी ऑनलाइन पर्यायाचा वापर करावा.
दीपक देवहाते,अधीक्षक अभियंता, महावितरण

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com