जिल्हा परिषद : चार संवर्गातील कर्मचाऱ्यांची समुपदेशन प्रक्रियेद्वारे निवड; सीईओ, डीएचओंची उपस्थिती
अमरावती : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात चार संवर्गामध्ये कार्यरत असलेल्या ५० आरोग्य कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली आहे. ६ मार्चला झेडपीच्या सभागृहात सीईओ संजिता महापात्र यांच्या मार्गदर्शनात डीएचओ डॉ. सुरेश आसोले यांच्या उपस्थितीत पार पडली.
कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्याचे शासनाने आदेश दिले आहेत. त्यानुसार आरोग्य विभागातदेखील पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली होती. यानुसार आरोग्य सहायक पुरुष, आरोग्य सहायक महिला, आरोग्यसेवक पुरुष, आरोग्य सेवक महिला अशा चार संवर्गातील ५० कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती देण्यात आल्या. पदोन्नतीची प्रक्रियेसाठी आरोग्य विभागाचे प्रशासन अधिकारी राजेश रोंघे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी लिलाधर नांदे, वरिष्ठ सहायक ईश्वर राठोड, कनिष्ठ सहायक पुरुषोत्तम ठाकरे व अन्य कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
या पदावर बढती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या जिल्हाभरातील कर्मचाऱ्यांची सेवा ज्येष्ठता यादी प्रसिध्द केली होती. यानुसार जिल्ह्यातील १४ पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या विविध ठिकाणच्या आरोग्य विभागातील पदोन्नती पात्र कर्मचाऱ्यांना सीईओंच्या उपस्थितीत पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्यात आली. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीची ही प्रक्रिया समुपदेशन पद्धतीने राबविण्यात आली. यामध्ये आरोग्य सहायकांना आरोग्य पर्यवेक्षक आणि आरोग्यसेवक यांना आरोग्य सहायक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com