खंडीकरण करून डांबरीकरण करण्याची मागणी: गावकरी व वाहन धारक
कोरची : कोरची पासुन 6 कि.मी अंतरावर सोहले खडकाघाट येथे आदिवासी कवर समाजाचे शंकर भगवान मंदिर आहे. दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येत असतात. पण मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खडृडे पडले असल्याने अनेक वाहन व भाविकांना दर्शनासाठी अतिशय त्रास सहन करावा लागत असुन, संबंधित विभाग अधिकारी यांनी दखल घेऊन रस्ता दुरूस्ती करण्यात यावा अशी मागणी येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांनी व गावकर्यानी केली आहे.
कोरची तालुक्यात सोहले, कुंभकोट, टिपागड, वाको या सर्व ठिकाणी पर्यटन स्थळाला लागुन मोठे मोठे नाले आहे. नाल्या लगत बंगीचा असुन, या ठिकाणी मंदिर आहेत. हे चारही ठिकाणचे मंदिर प्रसिध्द असुन दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येतात तर अनेक पर्यटक बाहेर जिल्यातुन राज्यातुन येत असतात. पण राज्य मार्गावरून मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर खडडे पडलेले दिसत आहेत. रस्ता खराब झाला असुन रस्त्याची दुरूस्ती करून खंडीकरण करून डांबरीकरण करण्यात यावी अशी मागणी अनेक भाविकांनी व वाहनधारक गावकरी लोकांनी केली आहे.

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com