मागणी वाढल्यास विजेचा लपंडाव होणार सुरू
अमरावती : सध्या शहरात फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाचा तडाखा वाढल्याचे चित्र आहे. परिणामी, विजेच्या – मागणीमध्ये वाढ व्हायला सुरुवात झाली – आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात विजेची मागणीमध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता असून, मागणी वाढल्यास विजेचा लपंडाव वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही. सध्या शहरात काही भागांमध्ये काही वेळाकरिता वीजपुरवठा खंडित होत असल्याचे चित्र आहे.
अलीकडच्या काळात बाराही महिने विजेच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात विजेची समस्या अधिक आहे. आता उन्हाळ्याला सुरुवात झाली असून, वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच प्रखर ऊन आणि वातावरणात उकाडा जाणवत आहे. त्यामुळे फॅन, एसीचा वापर वाढला असून, – वीजमीटर पळू लागले आहे. त्यामुळे विजेच्या मागणीतही वाढ झाली आहे. – शहरातील काही भागांमध्ये विजेचा लपंडाव सुरू आहे. महावितरणने – वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी वीजग्राहकांतून होत आहे. वीजबिलापोटी – थकबाकीचा डोंगरही वाढत असून, वसुलीस अडचणी येत आहे. त्यामुळे – थकबाकीदार वीजग्राहकांनी देयके भरणे आवश्यक आहे.
फॅन, एसी, कूलर फूल स्पीडवर फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच प्रखर ऊन आणि वातावरणात उकाडा जाणवत आहे. त्यामुळे फॅन, एसीचा वापर वाढला असून, वीजमीटर पळू लागले आहे. अडगळीत पडलेले कूलरही आता दुरुस्तीसाठी काढण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे.
वीजगळती जास्त तेथे जास्त भारनियमन ज्या भागांमध्ये वीजगळती आहे, अशा भागांमध्ये काही प्रमाणात भारनियमन असते. शहरातील पाच फिडवरून वीज गळती होत असल्याची माहिती महावितरण कार्यालयाने दिली आहे.
१ एप्रिलपासून काय बदल होणार?१ एप्रिलपासून विजेचे नवे दर लागू होणार आहेत, यामुळे वीज ग्राहकांचे नुकसान नव्हे, तर त्यांचा फायदाच होणार असल्याचा सरकारचा दावा असला, तरी विजेच्या बिलात भरमसाठ वाढ होण्याचा दावा अनेक संघटनांनी केला आहे, नागरिकांनाही तीच भीती आहे
वाढते ऊन अन् वीजदर फोडतोय घाम जिल्ह्यात सध्या उन्हाचा तडाखा वाढल्याने विजेचा वापरही मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे चित्र आहे. या वाढलेल्या विजेच्या वापरामुळे आता वीजबिलातही वाढ होणार आहे.
शहरात भारनियमन केले जाते का?शहरात सध्या कोणत्याच भागामध्ये भारनियमन सुरू नाही, परंतु काही तांत्रिक बिघाड, तसेच इतर कारणामुळे काही वेळाकरिता वीजपुरवठा खंडित राहत असल्याच्या तक्रारी काही भागांतील नागरिकांकडून होत आहे.
आताच ही स्थिती तर पुढे काय?फेब्रुवारीपासून उन्हाचा तडाखा वाढल्याने विजेची मागणी वाढली आहे. मार्च, एप्रिल व मे या महिन्यात उन्हाचा तडाखा अधिक वाढल्यावर विजेचा वापर वाढणार आहे. त्यामुळे काही प्रमाणात भारनियमन राहण्याची शक्यता आहे.
सध्या शहरात विजेची मागणी स्थिर आहे, परंतु एप्रिलपासून विजेची मागणी वाढण्याची शक्यता आहे. सध्या तरी शहरात कुठेही भारनियमन नाही.
संजय सराटे, कार्यकारी अभियंता,अमरावती शहर.

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com