
अमरावती : होळीनिमित्त जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा उद्या दिनांक १३ मार्चला सकाळच्या सत्रात भरविण्यात येणार आहे. ग्रामिण भागात सण- त्योहार मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर मोठा परिणाम दिसून येतो. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमांच्या शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याची मागणी विविध शिक्षक संघटनांनी गटविकास अधिकारी यांना केली होती.
शिक्षक संघटनांच्या मागणीला प्रशासनाने होकार देत जिल्ह्यातील विविध पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळा उद्या दिनांक १३ मार्चला सकाळच्या सत्रात भरविण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे होळीच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळा सकाळच्या सत्रात भरविण्यात येणार आहे.
शुक्रवारी धुलिवंदनाची सुटी
धुलीवंदन १४ मार्चला असल्याने या दिवशी शासकीय सुटी आहे. ग्रामीण भागात धुलीवंदनाच्या दिवशी बच्चे कंपणीसह लोक परस्परांवर गुलाल व नैसर्गिक रंगबेरंगी रंग उधळून हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. हा सण माणसातील आनंद,प्रेम आणि क्षमाशिलतेचा संदेश देतो.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





