
कोरची :- आश्रमशाळेचे कर्मचारी कोरची तालुक्यातील जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांना फितवून नेत असल्याचे वृत हाती आले आहे. गावात शिक्षक नसतात,इथल शिक्षण बरोबर नाही,आमची मुल हुशार होत नाही, त्यामुळे आम्ही मुले बाहेरगावी पाठवितो, अशी प्रतिक्रिया मुलांच्या पालकांनी दिली आहे.
अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधीचे जिल्हा परिषद शाळेकडे दुर्लक्ष
भंडारा गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील बुधयेवाडा, गोठणगांव, पिंपळगाव, लाखांदूर, तुळशीकोकळी, पळसगाव, अरततोंडी, वडेगांव इत्यादी गावात खाजगी अनुदानित आश्रमशाळा आहेत. प्रत्येक शाळेत १०० ३०० विद्यार्थी या तालुक्यामधून ओढून नेतात, तेथील शिक्षक पालकांच्या घरी मुक्काम ठोकतात. पालकांना रात्री जेवणात दंग ठेवतात. विद्यार्थ्यांना गणवेश, नोटबुक्स व सर्व साहित्य पुरविण्याचे आश्वासन देतात. पालकांच्य खिशात २ ते ३ हजार रुपये टाकतात व डोळ्यादेखत जिपमध्ये विद्यार्थ्यांना कोंबून घेऊन जातात. याबाबत पालकाची भेट घेतली असता, आमच्या गावातील जिल्हा परिषदचे शिक्षक गावात राहात नाही. एक ते पाच वर्ग असून, दोनच शिक्षक आहेत. त्यापैकी एक शिक्षक नेहमी कार्यालयीन कामाने किंवा प्रशिक्षणासाठी बाहेरच असतात. त्यामुळे पाच वर्गासाठी एकच शिक्षक पूर्णवेळ असतो. त्यामुळे शिक्षणावर विपरित परिणाम होतो. म्हणून आम्ही मुलांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी बाहेरच्या आश्रमशाळेत पाठवितो, असे पालक म्हणाले.
जि.प शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता पूर्ण ढासळली
तालुक्यात १३ द्विशिक्षकी प्राथमिक ५ ते ७ शिक्षकी १९ उच्च प्राथमिक शाळा असून तालुक्यातील ३-४ मोठी गावे वगळता सर्वच गावातील शिक्षक बाहेरगावाहून शाळेत ये-जा करतात, त्यामुळे कोणतेही शिक्षक वेळेवर शाळेत येत नाही. बन्याच वेळा शाळेत एकही शिक्षक हजर नसतो. परंतु शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायतच्या लोकांना हे लोक खुश ठेवण्यात पटाईत आहेत. त्यामुळे गुरुजी चांगले आहेत म्हणून लोक त्यांची तक्रार करीत नाहीत. परिणामी या तालुक्यातील जि.प शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता पूर्ण ढासळली आहे. याला अधिकारी जबाबदार असून, शिक्षकांना मुख्यालयी राहण्यास सूचित करावे व जे शिक्षक मुख्यालयी राहत नाही, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com