महिनाभरात जलसाठ्यात १२ टक्क्यांची घट

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पाणीसाठा निम्म्यावर : ६६ टक्क्यांवरून जलसाठा ५४ टक्क्यांवर

 

परिणामी लघु प्रकल्पाच्या क्षेत्रातील नागरिकांना पाणी टंचाईची झळ बसण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

 

 

अमरावती : उन्हाची तीव्रता वाढू लागली असून, ग्रामीण व डोंगराळ भागात पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले आहेत. जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम व लघु, अशा एकूण ५६ सिंचन प्रकल्पांत सद्यःस्थितीत ५४ टक्के (५६८ दलघमी) जलसाठा शिल्लक आहे. यामुळे या प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या शहरी व ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना पुरेसा जलसाठा मिळणार आहे. या भागांना टंचाईच्या झळा बसणार नसल्या, तरी दोन मध्यम व लघु प्रकल्पांच्या क्षेत्रातील योजनांना मात्र टंचाईच्या झळा पोहोचण्याची शक्यता आहे. गेल्या महिनाभरात पाणीसाठ्यात १२ टक्क्यांची घट झाली आहे. जिल्ह्यात अप्पर वर्धा या मोठ्या प्रकल्पासह सात मध्यम व ४८ लघु प्रकल्प आहेत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ६६ टक्के पाणीसाठा शिल्लक होता, तो आजघडीला ५४ टक्क्यांवर आला आहे.

अप्पर वर्धा धरणात सध्या ३२० दलघमी (५६ टक्के) जलसाठा उपलब्ध आहे. या प्रकल्पातून अमरावती शहरासह ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना पुरवठा करण्यात येतो. हा जलसाठा उन्हाळ्यात कमी पडणार नसल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचे मत आहे. यंदा पावसाळ्यात मुबलक पाऊस झाल्याने धरणे शंभर टक्के भरली होती. सात मध्यम प्रकल्पांतील जलसाठ्याची स्थिती सध्या चांगली आहे. एकूण १३७ दलघमी (५३ टक्के) जलसाठा या प्रकल्पांमध्ये सद्यःस्थितीत असून, पंढरी व बोर्डीनाला या प्रकल्पांतील साठा मे महिन्याच्या मध्यात संपुष्टात येण्याची शक्यता आहे. तर शहानूर, चंद्रभागा, सपन व पूर्णा या प्रकल्पातील जलसाठा सध्या सरासरीने उत्तम असला, तरी पुढील हंगामात पावसाला विलंब झाल्यास टंचाईची स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लघु प्रकल्पांच्या क्षेत्रातील पाणीपुरवठा योजना अडचणीत येण्याची शक्यता असून, पाणीटंचाई निर्माण होण्याचा अंदाज आहे. ४८ लघु प्रकल्पांत ४८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यातील काही प्रकल्पांनी तळ गाठण्याकडे वाटचाल सुरू केली आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013546
error: Content is protected !!