जिल्हा परिषदेचा अलर्ट : जिल्ह्याचा पारा ३९ अंशांवर पोहोचल्यामुळे उपाययोजना
अमरावती : उन्हाच्या झळा वाढल्या असून, कमाल तापमान ३९ अंशांवर गेले आहे. तसेच पुढील तीन महिने पारा अधिक वाढणार आहे. यामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. सीईओ संजिता महापात्र यांनी सर्व ५९ प्राथमिक आरोग्य केंद्रांत उष्माघात कक्ष स्थापन करून तेथे पुरेसा औषधसाठाही ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. आरोग्य विभागाने प्रत्येक पीएचसीत उष्माघात कक्ष सज्ज केला आहे. दरवर्षी एप्रिल ते जून महिन्यात उष्माघाताचा प्रादुर्भाव होतो. जिल्ह्यात कमाल तापमान ३९ अंशांवर पोहोचला आहे. उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनाही काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
उन्हापासून असा करा बचाव दर तासाला १ ते १.५ ग्लास पाणी घ्यावे, लिंबू सरबत, फळांचा ताजा रस, पन्हे, कोकम सरबत, ताक, लस्सी असे द्रवपदार्थ घ्यावेत. आराम करावा सैलसर, पातळ, फिकट रंगाचे किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावेत.
उष्माघात टाळण्यास ही करा उपाययोजना गरज नसेल तर उन्हात बाहेर फिरू नये. बाहेर जाताना गॉगल, टोपी, रुमाल, छत्री अथवा सनकोट सोबत हवा. जर बाहेर जावे लागलेच तर उन्हापासून संरक्षण होईल याची काळजी घ्यावी.
उष्माघाताची कारणेउ न्हाळ्यात शेतात किंवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे, कारखान्याच्या बॉयलर रूममध्ये तसेच काच कारखान्यात काम, अधिक तापमानाच्या खोलीत काम, घट्ट कपड्याचा वापर.
नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, उष्माघाताचा त्रास जाणवू लागल्यास वैद्यकीय सल्ल्यासाठी किंवा निदानासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. लहान मुले, ज्येष्ठांनी विशेष काळजी घ्यावी,
डॉ. सुरेश आसोले डीएचओ झेडपी
ही आहेत उष्माघाताची प्रमुख लक्षणे
१. उन्हाळ्यात शरीराचे तापमान वाढल्यास त्याला उष्माघात म्हणतात.
२. मळमळ, उलटी, ताप, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, थकवा, चक्कर येणे, डोकेदुखी या तक्रारी सुरू होतात.
३. मनस्थिती बिघडते, व्यक्ती असंबंध बडबड करते, चिडचिड करते. जीभ जड होते, जास्त घाम येतो, पायात गोळे येतात.
४. पोटऱ्यात वेदना किंवा पेटके येणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैनी व अस्वस्थता, बेशुद्धावस्था.
५) उष्माघाताने कोणाचा मृत्यू होऊ नये यासाठी झेडपीचा आरोग्य विभागाने खबदारीच्या उपाययोजना केल्यात.

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com