वसंत ऋतूत ठरताहेत पळस, काटेसावरीचे फुले आकर्षण
पोहरा बंदी: चिरोडी जंगलातील डोंगरदऱ्या आणि शेताचे बांध पळसाच्या फुलांनी शोभून दिसत आहेत. ऋतुचक्रातही एक किमया दडलेली असून, वृक्षांनीही आपली जुनी झालेली पाने त्यागली आहेत, तर काही वृक्षांना याच हंगामात फुलोरा येत असल्यामुळे ती वृक्ष केसरी लाल रंगाची मुक्त उधळण करीत असल्याचे पोहरा-चिरोडी जंगलात पाहावयास मिळत आहे. वडाळी आणि चांदूर रेल्वे जंगलात सागाऐवजी पळसाची झाडे भरपूर प्रमाणात मिळतात. त्यामुळेच भकास झालेल्या जंगलात पिवळ्या, नारंगी पळस फुलांनी लक्ष वेधले आहे. जुन्या काळात होळीसाठी या फुलांचा रंग वापरला जात होता.

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com
Post Views: 25