ट्रकच्या धुळ व वायु प्रदुर्शनाने सत्रापुरच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात
कन्हान : नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्र.८. सत्रापुर येथील गावा लगत असलेल्या रिता स्टिल व नागपुर पावर लिमिटेड कंपनीत ये-जा करणा-या ट्रक च्या जड वाहतुकीमुळे उळणारी धुळीने वायु प्रदुषण मोठया प्रमात होत असल्याने स्थानिक नागरीकांच्या आरोग्या स धोका निर्माण झाल्याने त्वरित उपाययोजना करून नागरिकांना या धुळ व वायु प्रदुर्शना पासुन मुक्त करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी न प मुख्याधिकारी व पोलीस निरिक्षक कन्हान हयाना निवेदन देऊन केली आहे.
नगरपरिषद कन्हान-पिपरी क्षेत्रातील प्रभाग क्र.८ सत्रापुर हे अडीच ते तीन हजार लोकसंख्येचे गांव असुन गावा लगत रिता स्टिल (आनंदम लॉजेस्टी क) व नागपुर पावर लिमिटेड (खंडेलवाल फेरो अलॉय ) कंपनी च्या रस्त्यावर रिता स्टिल कंपनीचे जड वाहतु कीचे १० , १२ चाकी आणि त्यापेक्षाही जास्त चाकी ट्रक दिवसरात्र २४ तास ये-जा करित असतात ही वाह तुक गावालगत कंपनीच्या कच्या रस्त्यावरुन जड वाह तुक होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात दिवस-रात्र २४ तास धुळ उळुन वस्तीच्या नागरीकांच्या घरामध्ये शिरते. यामुळे घराची वारंवार स्वच्छता करावी लागते.
तसेच ही धुळ हवेत मिश्रळुन खाद्य पदार्थातुन, श्वसना व्दारे शरिरात जात असल्याने गावातील छोटी मुले, स्थानिक नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. कंपनी मालकाशी फोनवर चर्चा केल्यास कोण तेही सकारात्मक उत्तर न देता गैर जबाबदार शब्दाचा उपयोग केला जातो. या दररोज होणा-या धुळीच्या वायु प्रदुषणामुळे नागरिकांच्या जिवितास काही बरे वाईट झाल्यास कंपनी तसेच संबधित अधिकारी जवा बदार राहतील.
यास्तव सत्रापुर येथील नागरिकांनी नगरपरिषद मुख्याधिकारी मा. दिपक घोडके व कन्हा न पोलीस निरिक्षक मा. राजेंद्र पाटील हयाना निवेदन देऊन कंपनीच्या जड वाहतुकीने स्थानिक नागरीकां च्या आरोग्यास धोका निर्माण झाल्याने त्वरित चौकसी करून योग्य उपाययोजना करून नागरिकांना या धुळ व वायु प्रदुर्शनापासुन मुक्त करावे. अशी मागणी केली आहे. याप्रसंगी देविदास पेटारे, उमेश पौनिकर, देवानंद पेटारे, मुरली पात्रे, प्रकाश शेंडे, भगवान भोवते, नेहाल शेंडे, अर्जुन पात्रे, चंपाबाई वाणी, सुनिताबाई यादव सह नागरिकांनी केली आहे.

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com