Washim : घरकुल हप्त्याची रक्कम द्यावी अन्यथा ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

मानोरा:- तालुक्यातील इंझोरी येथील मोदी आवास, रमाई आवास, शबरी आवास योजना अंतर्गत घरकूल मिळालेल्या लाभार्थ्यांना घरकुलाचे काम पूर्ण होऊन एक वर्ष झाले तरी अद्यापही MRGS अंतर्गत मिळणारे मस्टरचे पैसे व २० हजार रुपयांचा शेवटचा हप्ता मिळाला नसल्याने कर्जबाजारी होण्याची पाळी आलेली आहे. त्यामुळे तात्काळ रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात अदा करावी, अन्यथा आपल्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याच्या इशाऱ्याचे निवेदन लाभार्थ्यांनी गट विकास अधिकारी यांना दिले आहे.

 

Search key च्या तांत्रिक बिघाड अभावी वर्षभरापासून लाभ नाही

कर्ज काढून घरकुलाचे काम पूर्ण केले. त्यामुळे कर्जबाजारी झालो आहोत. घेतलेले कर्ज कसे फेडावे या विवंचनेत आम्ही सापडलो ग्रामपंचायतकडे वारंवार विचारणा केली असता सर्च की दुरुस्त नसल्याचे तांत्रिक कारण सांगण्. सर्च की दुरुस्त या तांत्रिक अडचणी अभावी घराचे लाभ थांबले आहे. येत्या आठवड्यात प्रलंबित अनुदान न मिळाल्यास आम्ही घरकुलधारक लाभार्थी ठिय्या आंदोलन करणार असा इशारा लाभार्थ्यांनी दिला आहे. निवेदन देतेवेळी इंझोरी येथील सीताराम रत्नपारखी, धनराज इंगळे, शरद हलदे, रघुनाथ कांबळे, अनिल राठोड, श्रवण नागोलकर, वंदना काळेकर, शोभा हळदे, मनोरम रत्नपारखी, प्रमिला पुंड, गणेश नायसे, कैलास डोंगरे आदी उपस्थित होते.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013546
error: Content is protected !!