Controversy: औरंगजेबच्या कबरीचा वाद; नागपुर पुन्हा तापले…बघा VIDEO

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

औरंगजेबाचा पुतळा जाळला, चप्पलांचा मारा

नागपूर : संपूर्ण राज्यात औरंगजेबाची कबर हटवण्यावरून वातावरण चिघळले आहे. यामध्येच आता नागपुरातही औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी आंदाेलन करण्यात आले. आज बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी  औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी निषेध केला. औरंगजेबाची कबर हटविण्यात यावी, अशी मागणी करत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी माेर्चा काढला.

 

 

 

 

नागपुरात महल येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी निदर्शने करण्यात आली. या मोर्च्यात अनेक विहिंप कार्यकर्त्यांनी औरंगजेबाच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच कार्यकर्त्यांनी औरंगजेबाच्या पुतळ्यावर चप्पल फेकली, तर काहींनी त्याचा पुतळा जाळला. कार्यकर्त्यांनी चाैकात एकत्र येऊन घाेषणा दिल्याने तणाव निर्माण झाला.

हा माेर्चा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून काढण्यात आला हाेता. मात्र काही युवकांनी एकत्र येऊन औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी घोषणाबाजी केली. यासोबतच, महाराष्ट्र सरकारला औरंगजेबाची कबर काढून टाकण्यासाठीअल्टिमेटम देण्यात आला आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013546
error: Content is protected !!