अंजनगाव सुर्जीत सत्तासमीकरणांचा निर्णायक कौल; उपाध्यक्षपदी प्रियंका शंकर मालठाणेंची निवड

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : अंजनगाव सुर्जी नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शहराच्या राजकारणाला नवी कलाटणी मिळाली असून, सत्तासमीकरणांवर स्पष्ट आणि निर्णायक शिक्कामोर्तब झाले आहे. बहुरंगी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या या निवडणुकीत सौ. प्रियंका शंकर मालठाणे यांनी तब्बल १५ मतांची आघाडी घेत उपाध्यक्षपदावर विजय मिळवला. त्यांच्या या यशामुळे नगर परिषदेतील राजकीय गणिते नव्याने रेखाटली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
या लढतीत सुयोग उत्तमराव खाडे आणि रामण्य रविंद्र आवंडकर हे दोन प्रमुख प्रतिस्पर्धी रिंगणात होते. मतदानाच्या निकालात सुयोग खाडे यांना ११ मते, तर रामण्य आवंडकर यांना ३ मते मिळाली. या आकड्यांवरून बहुमताचा कल कोणत्या दिशेने झुकला आहे, हे स्पष्ट झाले.
मतदान प्रक्रियेत सहभागी नगरसेवकांमध्ये अविनाश गायगोले, पुनम सुरज येऊल, उमेश तुळशीराम भोंडे, सौ. रुपाली सुधीर देवगारे, सुयोग उत्तमराव खाडे, सौ. उमा राजेश ओळंबे, प्रविण देविदास नेमाडे, सौ. प्रियंका निलेश आवंडकर, मो. आशिक म. शरीफ अन्सारी, रामण्य रविंद्र आवंडकर, सौ. शाहिनपरवीन मुजम्मील अली, सौ. नसीमाबी रहिमशहा, शोएबखान युसुफखान, सौ. सिमा गजानन विजेकर, मो. रेहान अ. मुनाफ, श्रीकांत मोहन जुनघरे, सौ. सुनीता भास्कर बाळे, सौ. उज्ज्वला विलास कविटकर, मनीष काशिनाथ मेन, सौ. आयशा परविन अकबरशहा, सौ. नाजियाबानो मो. इरफान, आसिफ ताजमोहम्मद, सौ. आफरीन कौसर अ. नईम, सौ. योगिता प्रदीप देशमुख, मो. नाझीम मो. अयुब, सौ. आबेदाबी मो. आरिफ, इब्राहिम बेग हसन बेग, अविनाश ज्ञानेश्वर ढेगे तसेच नवनिर्वाचित उपाध्यक्ष सौ. प्रियंका शंकर मालठाणे यांचा समावेश होता.
राजकीय विश्लेषकांच्या मते, ही निवडणूक केवळ एका पदापुरती मर्यादित नसून, नगर परिषदेतील आगामी निर्णयप्रक्रियेची दिशा ठरवणारी ठरली आहे. विविध गटांतील नगरसेवकांनी एका बाजूने स्पष्ट भूमिका घेतल्याने, शहर विकासाशी संबंधित विषयांवर भविष्यात अधिक सुसंगत आणि प्रभावी निर्णय होण्याची शक्यता बळावली आहे.
ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत व नियमानुसार पार पडली. समसमान मतसंख्या झाल्यास अध्यक्ष अथवा पिठासीन अधिकाऱ्यांचा निर्णायक मताधिकार वापरण्याची तरतूद असली तरी, या वेळी स्पष्ट बहुमत मिळाल्याने तो प्रसंग उद्भवला नाही.
निवडीनंतर सौ. प्रियंका शंकर मालठाणे यांनी सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन काम करण्याची भूमिका जाहीर केली. शहरातील नागरी सुविधा, स्वच्छता, पायाभूत विकास आणि प्रशासनातील समन्वय यांना प्राधान्य देत सर्वसमावेशक विकासावर भर दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अंजनगाव सुर्जी नगर परिषदेत स्वीकृत नगरसेवक म्हणून पंकज मोदी, संतोष वर्मा. कलीम अ. कलाम यांची निवड झाल्याने, नगर परिषदेच्या कार्यकक्षेला आणखी बळ मिळाल्याचे मानले जात आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

011973
error: Content is protected !!