मेळघाट येथील अवैध धंदे बंद करा-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) धारणी : भारतीय जनता पार्टीचे मेळघाट, अमरावती ग्रामीण जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी मेळघाटात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात त्वरित कारवाईची मागणी केली असून, यासाठी त्यांनी राज्याचे महसूल मंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदन सादर केले होते. या निवेदनाची गंभीर दखल घेत पालकमंत्री बावनकुळे यांच्या पुढाकाराने दिनांक 11 जुलै 2025 रोजी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत मेळघाटातील वाढत्या अवैध क्रियाकलापांविषयी चर्चा करण्यात आली व प्रशासनाला तातडीने कठोर पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले. मेळघाट विधानसभा क्षेत्र हे अतिदुर्गम असून, धारणी व चिखलदरा हे दोन्ही तालुके या क्षेत्रात येतात. येथील बहुतांश जनता आदिवासी असून मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. परंतु, सध्या या भागात वरली मटका व अवैध दारूचा व्यापार खुलेआम सुरू असून काही ठिकाणी हे प्रकार स्थानिक अधिकाऱ्यांच्या आदिवासी संगनमताने सुरू असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या अवैध व्यवसायांमुळे समाजातील अनेक गरीब नागरिक सदूयाच्या विळख्यात अडकले असून, त्यांच्या कुटुंबातील मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि भवितव्य धोक्यात आले आहे. अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत, जे समाजाच्या विकासासाठी अत्यंत धोकादायक बाब आहे. या पार्शवभूमीवर, प्रभुदास भिलावेकर यांनी निवेदनाच्या माध्यमातून मेळघाटातील कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न उचलून धरले. या बैठकीमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाकडून लवकरच कडक कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013515
error: Content is protected !!