महिला आर्थिक विकास महामंडळाचे कंत्राटी कर्मचारी जिल्हाकचेरीवर धडकले

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमरावती : महिला आर्थिक विकास कंत्राटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित व न्याय्य मागण्यांसाठी बुधवारी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा आणि धरणे आंदोलन केले.

हा मोर्चा भारतीय मजदूर संघ संलग्न महिला आर्थिक विकास महामंडळ कंत्राटी कर्मचारी संघ महाराष्ट्र यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. आंदोलनाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून झाली. मोर्चात शेकडो महिला सहभागी होऊन जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या.कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये लोकसंचालित साधन केंद्रांना प्रशासकीय खर्च व मानधनासाठी २५ लाखांचा निधी तत्काळ उपलब्ध करावा, सी. आर. पी (समुदाय साधन व्यक्ती) यांना ‘उमेद’ योजनेतील सीआरपीप्रमाणे दरमहा ६ हजार रुपये मानधन द्यावे, माविम स्थापन बचतगटांना ‘उमेद’ योजनेप्रमाणे ३० हजार रुपयांचा फिरता निधी मिळावा, बचतगटांना ७ टक्के व्याजदराने बँकांकडून कर्ज मिळावे, या मांगण्यांचा समावेश आहे.

मोर्चात सहभागी प्रशासनाकडून दिलेल्या महिलांनी वेळोवेळी आश्वासनांची आठवण करून देत तत्काळ निर्णय घेण्याची मागणी केली. प्रशासनाने याबाबत सकारात्मक भूमिका घेतली नाही, तर पुढील काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013511
error: Content is protected !!