शिवसेनेच्या आंदोलनाआधीच दर्यापूर नगर परिषद प्रशासनाने घेतली दखल

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) दर्यापूर :नागरी समस्यांसाठी शिवसेना पक्षाच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने १३ ऑगस्ट रोजी दर्यापूर नगर परिषद कार्यालयात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्या आला होता. त्यानंतर आंदोलनाच्या आधीच (ता. १२) नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ. विकास खंडारे यांनी शिवसेना पदाधिकारी यांना बोलावून आढावा बैठक घेतली आणि दर्यापूर येथील सर्व समस्या ऐकून घेतल्या. नागरिकांच्या विविध समस्या मार्गी लावणार असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी नगरपरिषदचे आरोग्य विभागाचे प्रमुख यांच्यावरही प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. यावेळी दर्यापूर पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर, शिवसेना जिल्हा समन्वयक प्रदीप वडतकर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख अलकाताई पारडे, शिवसेना विधानसभा संघटक बबनराव विल्हेकर, युवासेना शहर प्रमुख रुपेश मोरे, शिवसेना उपशहर प्रमुख खंडू पाटील राऊत, शिवसेना उपशहर प्रमुख शादाफ सुफी, शिवसेना उपशहर प्रमुख नकुल गुजर, संतोष शिंदे, विलास कैसर, सतिश जामनिक, हिमांशू खंडारे, सतिश खंडारे, हिरालाल इंगळे, मंगेश पारडे, उमेश भुरे, बादल सवयी, सुरज बाकपांजर, बंडूभाऊ इंगळे, निलेश पारडे तसेच शिवसैनिक उपस्थित होते.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013510
error: Content is protected !!