दर्यापूर – अंजनगाव सुर्जी शेतकऱ्यांसाठी भव्य मोर्चा; ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) दर्यापूर : सतत आणि अतिवृष्टीमुळे दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी आमदार गजानन लवटे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा तहसिल कार्यालयावर संपन्न झाला.

उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे यांना निवेदन देताना आंदोलनकार्‍यांनी ठणकावून सांगितले की, दिवाळीपूर्वी लोकांच्या खात्यात मदत रक्कम जमा केली नाही तर पुढील पावले तीव्र पद्धतीने उचलली जातील.

मोर्चामध्ये शिवसेना व युवासेना तालुका व जिल्हा पदाधिकारी, महिला आघाडी सदस्य, सहकार सेना पदाधिकारी तसेच शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. सहभागी उपस्थितींनी प्रशासनाने त्वरित कार्यवाही करण्याची मागणी केली.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013508
error: Content is protected !!