ऑनलाईन सर्व्हिस महागात पडली, बँक खात्यातून 4 लाख 65 हजार गायब; सराफांची सायबर सेलकडे तक्रार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जळगाव घरातील वॉशिंग मशिन दुरुस्तीसाठी गुगलवरुन सर्व्हिस सेंटरला कॉल केला, दरम्यान एपीके फाईल मोबाईलवर आली अन् दोन दिवसांनी एका व्यक्तीच्या मोबाईलमधून चक्क पावणे पाच लाख रुपये गायब झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोबाईल (Mobile) वापरत असताना ऑटो डाऊनलोड सेटिंग सुरू राहिल्याने हॅकरने मोबाईल हॅक करून जळगाव मधील रहिवासी निलेश सराफ यांच्या बँक (Banking) खात्यातून तब्बल 4,65,000 लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अलिकडच्या काळात मोबाईलवरुन ऑनलाईन ट्रान्झॅक्शन किंवा ऑनलाईन खरेदी, आर्थिक व्यवहार ही देखील आपली गरज बनली आहे. मात्र, मोबाईल बँकिंग वापरताना प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी, हेच या घटनेतून दिसून येते.

मोबाईल वापरणे, त्यातही स्मार्टफोन वापरणे ही आता प्रत्येकाची जीवनावश्यक बाब बनली आहे. मात्र मोबाईल हाताळताना काळजी घेणे गरजेचे झाले आहे. मोबाईल सेटिंगमधील ऑटो डाऊनलोड सेटिंग सुरू राहिल्याचा फटका जळगावमधील निलेश सराफ यांना बसला असून, चोरट्यांनी त्यांचा मोबाईल हॅक करत तब्बल पावणे 5 लाखांची लूट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जळगाव शहरातील रहिवासी असलेल्या निलेश सराफ यांच्या घरातील कपडे धुण्याचे मशीन खराब झाल्याने त्यांनी कपडे धुण्याचे मशीन खरेदी केलेल्या कंपनीला मशीन दुरुस्तीसाठी कॉल केला होता. या कॉल नंतर त्यांना ओटीपी मागण्यात आल्याच सराफ यांनी म्हटल. सराफ यांनी संबंधित कंपनीला ओटीपी दिल्यानंतर काही वेळात त्यांच्या बँक खात्यातून तब्बल 4 लाख 65 हजार रुपये काढले गेल्याचे त्यांच्या लक्षात आलेनिलेश सराफ यांच्या बँक खात्यातून पैसे काढले गेल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीनं सायबर पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली आहेया तक्रारीच्या अनुषंगाने सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलस या घटनेचा शोध घेत आहेतअशी माहिती पोलिस उपअधीक्षक नितीन गणपुरे यांनी दिली.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013508
error: Content is protected !!