कोरची येथील विद्युत केंद्राजवळील घटना
कोरची (Bike Accident) : दिवाळीच्या सणानिमित्त सासुरवाडीला जाण्यास निघालेल्या दुचाकी स्वाराचे दुचाकीवरील नियंत्रण बिघडून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार (Bike Accident) वडीलासह त्याची दोन लहान मुले जखमी झाल्याची घटना आज २० ऑक्टोबर रोजी कोरची येथील विद्युत केंद्राजवळ घडली. तुलसी बंजार (३५) , रणविर (६) आणि कबीर (४ ) रा. पिंडकेपार ता. देवरी अशी जखमी बाप- लेकांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, देवरी तालुक्यातील पिंडकेपार ( चिचगड ) येथील रहिवासी तुलसी बंजार हा त्यांच्या ६ आणि ४ वर्षाच्या मुलांना मोटारसायकल क्रमांक एम एच ३५ आर ६८८१ वर घेऊन सासुरवाडीस जात असताना कोरची येथील विद्युत केंद्राजवळ, तोल जाऊन तिघेही रस्त्याच्या कडेला पडले.
स्थानिक रहिवाासीयांनी वेळीच जखमींना रूग्णालयात घेऊन गेल्याने जखमींना औषधोपचार मिळाले. (Bike Accident) अपघाताची घटना गावात घडल्याने वेळीच मदत मिळाली, अन्यथा जंगल परिसरात अपघात झाले असते तर वेळीच उपचार मिळाले नसते असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
अपघातानंतर, त्याच रस्त्याने जात असलेले व्यावसायिक घनश्याम अग्रवाल आणि प्रतिष्ठीत नागरिक शालीकराम कराडे या (Bike Accident) दोघांनीही जखमींना ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले. तेथील डॉ. नितेश वंजारी यांनी औषधोपचार केले. मुलांच्या हातापायाला, डोक्याला व हनुवटीजवळ दुखापत झाली असल्याचे व प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





