-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील वडाळी शेतशिवार परिसरात वाघाचा संचार असल्याची घटना उघडकीस आली असून वाघाने एका पाळीव प्राण्याची शिकार केल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या महिनाभरात दहिगाव, हिरापूर आणि आता वडाळी परिसरात वाघाने पाळीव जनावरांवर हल्ले केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या सततच्या हल्ल्यांमुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मात्र, वनविभागाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. गावकऱ्यांनी वनविभागाला तात्काळ गस्त वाढविण्याची, पिंजरा लावण्याची आणि वाघाला पकडण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाला आवाहन केले आहे की ग्रामीण भागात पुन्हा अशा घटना घडू नयेत, यासाठी आवश्यक ती त्वरित पावले उचलावीत.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






