भक्तिरसाने ओथंबले गणेश नगर — हनुमान मंदिरात काकड आरतीचा उत्सवमय शेवट

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अंजनगाव सुर्जी | प्रतिनिधी – सचिन इंगळे : अंजनगाव सुर्जी शहरातील गणेश नगर येथील श्री संकटमोचन हनुमान मंदिरात दरवर्षीप्रमाणे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सुरू झालेल्या नित्य काकड आरतीचा समारोप कार्तीक देवउठनी एकादशीच्या दिवशी मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात पार पडला. पहाटेच्या आरतीने आणि प्रभात फेरीने परिसरात भक्तिरसाचे वातावरण निर्माण झाले.

मंदिर परिसर फुलांच्या सजावटीने, रांगोळ्यांनी आणि दीपप्रज्वलनाने सुशोभित करण्यात आला होता. मृदंग-टाळांच्या गजरात झालेल्या आरतीदरम्यान “जय श्रीराम” आणि “पवनसुत हनुमानजी की जय” अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. त्यानंतर भजन-कीर्तन, हनुमान चालीसा पठण यामुळे संपूर्ण वातावरण मंगलमय झाले.

या प्रसंगी स्थानिक महिला मंडळे, युवक मंडळे आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरतीचा लाभ घेतला. आरतीनंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. भक्तांनी उत्साहात महाप्रसादाचा लाभ घेतला.

मंदिर समितीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित भक्तांचे स्वागत करून आभार मानले. त्यानंतर सायंकाळी मंडळाच्या सदस्यांनी अचलपूर येथील कार्तीक स्वामी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. या धार्मिक उपक्रमामुळे गणेश नगर परिसरात श्रद्धा, भक्ती आणि एकतेचा संदेश पसरला.

या कार्यक्रमाला श्री ज्ञानदेवजी पारे, विजयभाऊ गुहे, राजूभाऊ इसाने, गजाननभाऊ मुधोळकर, आशिषभाऊ चोपडे, अंकुशभाऊ गुहे, अरुणभाऊ काळे, गोपालभाऊ पारे, पवनभाऊ गावंडे, ऋषिकेशभाऊ राऊत, जितूभाऊ गावंडे, एकनाथभाऊ पंचवटे, आयुष पारे, हर्षल राऊत, अथर्व चोपडे, देवेश तळोकार, अर्णव चौखंडे, श्रीरंग वाघमारे, कृष्णा चांदुरकर तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013506
error: Content is protected !!